कायदाविषयक - अर्थव्यवहार
-
Sale! Add to cartशेअरबाजार म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ- तसाच अनिश्चित, तसाच निसरडा. पण क्रिकेटचा खेळाचेही काही एक तंत्र असतेच. आणि हे तंत्र समजावून देणारे कसलेले खेळाडू असतील तर ? गुंतवणुकीतील आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहॅम म्हणजे क्रिकेटमधला विजय मर्चंट. सर जॉन टेम्पलटन म्हणजे जणू सुनील गावसकर. यशस्वी खेळ्या करणा-या वॉरेन बफेची तुलना सचिन तेंडुलकरशीच होईल. जातिवंत सट्टेबाज जॉज सोरोस सौरभदादा गांगुलीची आठवण करून देणार. तर या क्षेत्रावर पुस्तके लिहून अफाट लोकप्रियता कमावणारे पीटर लिंच म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा राहुल द्रवीड. या पाच गुंतवणुक-तज्ज्ञांनी सांगितलेले यशाचे तंत्र महत्त्वाच्या युक्त्याप्रयुक्त्यांसह तपशीलवार समजावून देणारे एखाद्या कादंबरीसारखेत सरस आणि चित्तवेधक पुस्तक.
कायदाविषयक - अर्थव्यवहारGuntavnuk Panchayatan | गुंतवणूक पंचायतन
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreपगारदारांनी आपला इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? होमलोनच्या व्याजावर किती वजावट मिळते ? ती प्रत्येक सहमालकाला मिळते का ? सेकंड होम तुमचा इन्कम टॅक्स कसा वाचवते ? वीस हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज रोखीत का घेऊ नये ? घर, जमीन, दागिने विकून होणा-या कॅपिटल गेन्सवरील इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी दराने विकला तर काय होते ? शेअर्स, म्युच्युअल फंडाची युनिट्स, बॉण्ड्सवरील उत्पन्नावर इन्कम टॅक्स कसा आकारला जातो ? कोणत्या नातेवाइकांकडून मिळालेली गिफ्ट करमुक्त असते ? टी.डी.एस. टाळण्याचे राजमार्ग कोणते ? पॅन असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावेच लागते का ? अपंग नातेवाइकांच्या वैद्यकीय देखभालीच्या खर्चावर किती वजावट मिळते ? या आणि तुमच्या मनातील अशा अक्षरश: शेकडो प्रश्नांना सुंदर मराठीत उत्तरे देणारे हे पुस्तक करदाते, करसल्लागार व विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल.
कायदाविषयक - अर्थव्यवहारIncome Tax Vishayi Sare Kahi | इन्कम टॅक्सविषयी सारे काही
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Read more -
Sale! Add to cartजनहितयाचिका म्हणजे काय ? अनधिकृत बांधकामे करणा-या बिल्डर्सच्या मनमानी कारभाराला आळा घालता जावा, असे वाटत असल्यास... नदीच्या पाण्यात घातक रसायने सोडणा-या बेजबाबदार कंपन्यांना अद्दल घडावी, असे वाटत असल्यास... एखादा चित्रपट वा दूरचित्रवाणी मालिका आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांच्या प्रदर्शनावर बंदी आवश्यक वाटत असल्यास... तुरुंगातील कच्च्या कैद्यांना न्यायाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे खितपत पडावे लागू नये, असे वाटत असल्यास... महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून लैंगिक छळाला तोंड द्यावे लागू नये, असे वाटत असल्यास... कुणाही भारतीय नागरिकाला वा संघटनेला जनहितयाचिकेद्वारे अशा प्रकरणांत उच्च न्यायालयांत किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. वैयक्तिक स्वार्थासाठी जरी अशी कोणतीही याचिका करता येत नसली, तरी सार्वजनिक हितरक्षणासाठी मात्र हा मार्ग कुणालाही अनुसरता येतो. जनहितयाचिकेच्या या अभिनव मार्गाची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्याबद्दलच्या कायदेशीर तरतुदींपासून संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती असंख्य उदाहरणांसह देणारे हे संग्राह्य पुस्तक...
कायदाविषयक - अर्थव्यवहारJanhityachika Manvi Hakkasampadanacha Ek Prabhavi Marg | जनहितयाचिका मानवी हक्कसंपादनाचा एक प्रभावी मार्ग
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartवारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती असो किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असो, स्वामित्वहक्कासाराखी बौद्धिक संपदा असो किंवा ई-मेल अकाऊन्ट / फेसबुक इ. सारखी डिजिटल मालमत्ता असो, आपल्या निधनानंतर तिची नीट जपणूक व्हावी, असे वाटणा-या सर्वांनी वेळेवरच व्यवस्थापत्र करून ठेवले पाहिजे. वृद्धपकाळी, मृत्यूची चाहूल लागल्यावर घाईगडबडीत करावयाची ती गोष्ट नाही. समजून-उमजून योग्य वेळी आपल्या संपत्तीचे इच्छेनुरूप वाटप करून ठेवणे हे प्रत्येक प्रौढ, सधन माणसाचे कर्तव्यच आहे. शारीरिक व्याधींवरील उपचाराबाबतही प्रत्येक व्यक्ती योग्य वेळी आवश्यक सूचना आगाऊच देऊन ठेवू शकते. या सर्व बाबींची कायदेशीर अंमलबजावणी कशी करावी, याचा सोदाहरण सल्ला देणारे, एका कायदेविषयक तज्ज्ञाने लिहिलेले सोपे, सुबोध पुस्तक. कसे करावे ? व्यवस्थापत्र / इच्छापत्र / मृत्यपत्र / डिजिटल व्यवस्थापत्र आणि लिव्हिंग विल आगाऊ वैद्यकीय निर्देशांसह
कायदाविषयक - अर्थव्यवहारKase Karave? Vyavasthapan/ Ichapatra/ Mrutyupatra | कसे करावे? व्यवस्थापत्र / इच्छापत्र / मृत्युपत्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते. ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. कसे मिळवायचे हे हक्क ? कसे राखायचे हे हक्क ? कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा ? राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते ? अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे भान करून देणारे - कथा अकलेच्या कायद्याची
कायदाविषयक - अर्थव्यवहारKatha Aklechya Kaydyachi | कथा अकलेच्या कायद्याची
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartसर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार हा देशासमोरचा ज्वलंत प्रश्न. अस्तित्वच गिळू पाहणारा... लोकपाल विधेयक संसदेने पारित केले की, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भ्रष्टाचाराचा भस्मासुर वठणीवर येईल, अशी आपली भोळ्याभाबड्या जनसामान्यांची समजूत... ती निराधार आहे. राजकीय इच्छाशक्ती नसेल, तर अशी कितीही वैधानिक आयुधे परजली, तरी भ्रष्टाचाराचे निर्मूलन होऊ शकणार नाही, हे सर्व संबंधितांनी नीट समजून घेतले पाहिजे. एका ज्येष्ठ मुरब्बी सनदी अधिका-याने मूळ समस्येचे केलेले हे परखड विश्लेषण वाचले म्हणजे मग कुणालाही भ्रमनिरासाचा धक्का बसणार नाही.
कायदाविषयक - अर्थव्यवहारLokpalachi Mohini | लोकपालाची मोहिनी
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cart'आज भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत. परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली बाजी मारताना दिसत आहेत. एका बाजूला ही उत्साहवर्धक स्थिती, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अजूनही झगडावे लागते आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे. कधीकधी तर ही कसरत खुद्द न्यायसंस्थेलाच करावी लागते आहे की काय, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवते. या परिस्थितीतून मार्ग काढू इच्छिणाऱ्या सर्वांना हवी असते कायद्यांबद्दलची नेमकी माहिती. स्त्रीचे हक्क अबाधित राहावेत, तिला जगण्याचे बळ लाभावे या हेतूने राज्यघटनेपासून भारतीय दंड विधानापर्यंत आणि केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांनी भरपूर तरतुदी केल्या आहेत, योजना आखल्या आहेत. त्या सर्वांची तपशीलवार माहिती देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक.
कायदाविषयक - अर्थव्यवहारMahilanvishayiche Kayde | महिलांविषयीचे कायदे
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'माहिती अधिकार कायदा म्हणजे सरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे. पण ते प्रभावी ठरवण्यासाठी अंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी. आपण या कायद्यानुसार - कोणकोणती माहिती मागू शकतो ? अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ? तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ? यांसारख्या प्रश्नांपासून ... शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ? विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ? एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ? हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ? शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ? यांसारख्या प्रश्नांपर्यंत ... असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक ! सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक ...
कायदाविषयक - अर्थव्यवहारMahiti Adhikar Kayda | माहिती अधिकार कायदा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'हे पुस्तक कोणासाठी ? सामान्यांसाठी आणि अधिका-यांसाठीही. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि राजहंस प्रकाशन यांचा संयुक्त उपक्रम '
कायदाविषयक - अर्थव्यवहारMahiticha Adhikar Adhiniyam, 2005 | माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartअर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ ? शेअर्स ? म्युच्युअल फंड ? सोने ? स्थावर मालमत्ता ? पेन्शन स्कीम ? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा - मंत्र गुंतवणुकीचा
कायदाविषयक - अर्थव्यवहारMantra Guntavnukicha | मंत्र गुंतवणुकीचा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content