चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartहे पुस्तक वाचायला घेताना कोणत्याही पूर्वकल्पना मनात न ठेवलेल्या बर् या, कारण यातली सगळी स्फुटं तशी एकमेकांशी जोडलेली असली, तरी स्वतंत्र आहेत. त्यांचा एखादा विशिष्ट असा ढाचा नाही. आयुष्य सजगपणे आणि भरभरून जगताना मनात आलेले विचार, भावना, कल्पना, कधी घेतलेले काही निर्णय, अवतीभोवतीची माणसं, त्यांचं वागणं, वेगवेगळी परिस्थिती असं सगळंच दिसतं यात. त्यांचं एक मिश्रण, नव्हे, रसायन बनतं. आपली आयुष्यं असतात तशी बहुरंगी, बहुढंगी. आपण त्याकडे जाणीवपूर्वक बघत असलो, तर खूप काही हाती गवसतं. मला जे गवसलं, ते मला मांडावंसं वाटलं. असंच अनेकांनी लिहिलं, तर घरगृहस्थी' नावाचं एक भव्य कोलाज सहज बनू शकेल आणि ते अतिशय वेधक अन् रंजकही होईल. हे वाचून वाचणारे लिहिते झाले, तर मला भरून पावलं, असं मी म्हणेन. सरोज देशपांडे
All BooksKahani Ghargruhasthichee | कहाणी घरगृहस्थीची
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartराधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती; त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा ! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं... तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKahani Londonchya Aajibainchi | कहाणी लंडनच्या आजीबाईंची
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreकलावंत काय आणि विचारवंत काय ते प्रतिभावंत असतातच. पण बरेचसे अहंमन्य, त-हेवाईक, विक्षिप्त, व्यसनी, दुबळे ! ते स्वत:तच मश्गुल असतात. ते प्रेमात होरपळून निघतात. दारिद्रयात पिचून जातात. आपल्या उत्कट प्रतिभेशीच त्यांच्या अनावर निष्ठा असतात. आपल्या प्रतिभाशाली निर्मितीतून ते जगाच्या इतिहासात आपलं नाव लखलखत ठेवतात. पण जगाच्या व्यवहारात मात्र ते नगण्य ठरतात. वेदना आणि संवेदनांच्या वावटळीत सापडलले हे प्रतिभेचे प्रेषित कधी आकाशाएवढे प्रचंड भासतात; तर कधी खसखशीच्या दाण्याएवढे छोटे वाटतात. त्यांच्या समग्र जीवनाचे, त्यातल्या जीवघेण्या संघर्षाचे, त्यांच्या उत्तुंग झेपांचे आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांच्या वाटयाला आलेल्या सुखदु:खाचे चित्रण करणारे पुस्तक कलावंत आणि विचारवंत
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKalawant Aani Vicharvant | कलावंत आणि विचारवंत
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cartइंजिनीयर होण्याची महत्त्वाकांक्षा पुरी करण्याची जिद्द. तत्त्वांशी तडजोड न करण्याची सचोटी. मिंधेपणा अव्हेरणारा स्वाभिमान. या बळावरच त्यांनी लढा दिला व्यवस्थेतील भ्रष्ट मानसिकतेविरुद्ध. आजही ही लढाई सुरूच आहे. आपल्या सहप्रवाशांच्या सहकार्याने ही भ्रष्ट मानसिकता कधी ना कधी नष्ट होईल, असा आशावाद जागवणारे आत्मकथन.
All BooksKalokhatoon Ujedakade | काळोखातून उजेडाकडे
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार
All BooksKalyanilya Resha | काळ्यानिळ्या रेषा
₹690.00Original price was: ₹690.00.₹518.00Current price is: ₹518.00. Save ₹172 Add to cart -
Sale! Add to cartही रंजक कथा आहे बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची ! ती आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची... तशीच ती आहे सरदार घराण्यात जन्मलेल्या आणि माणसावर मनस्वी प्रेम केलेल्या एका रुबाबदार व्यक्तीची. वयाच्या चोविसाव्या वर्षी शेतीच्या अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला गेलेल्या जिद्दी तरुणाची ! लोकल बोर्डापासून यूनोपर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी लाभलेल्या एका दिलदार, लोकप्रिय नेत्याचीही !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKatha Bara Aksharanchi | कथा बारा अक्षरांची
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'The Woods are lovely dark and deep But I have promises to keep And miles to go before I sleep And miles to go before I sleep पं. जवाहरलाल नेहरूंच्या टेबलावर कायम असणाऱ्या या ओळी. त्या ओळींचा कवी होता रॉबर्ट फ्रॉस्ट. जागतिक साहित्यात आपला ठसा उमटवणारा हा प्रतिभावान अमेरिकन कवी एकीकडे अमेरिकेचा सर्वात लाडका आणि सर्वश्रेष्ठ कवी मानला गेला, तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची - अगदी आग पाखडणारी टीकाही झाली. मग खरा रॉबर्ट फ्रॉस्ट होता तरी कसा ? कवीचं जीवन अन् त्याची कविता यांच्या परस्परसंबंधाचा वेध घेणारे कवितेच्या शोधात
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKavitechya Shodhat | कवितेच्या शोधात
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची ! हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKayadeaazam | कायदेआझम
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Khelata Khelata Aayushya | खेळता खेळता आयुष्य
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Read more -
Sale! Add to cartत्यानं निर्माण केले मातीतून मोती वनस्पती-पानं-फुलं फळातून शोधल्या हजारभर वस्तू पालटून टाकली शेती नि शेतक-यांची स्थिती म्हणून तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ठरले किमयागार कार्व्हर जीनियस कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाची जीवनकहाणी. खास किशोर-कुमार वाचकांसाठी वीणा गवाणकर यांनी लिहिलीय साध्या सोप्या रसाळ मराठीत मोजक्या शब्दात तरी समग्र
All BooksKimayagar Carver | किमयागार कार्व्हर (मराठी )
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
">
Skip to content