चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Tamasha : Vithabaichya Ayushyacha | तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा
Read more -
Sale! Add to cartटाटा ... भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTatayan: Ek Poladi Udyamgatha | टाटायन : एक पोलादी उद्यमगाथा
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'तें तुम्ही आम्हाला पटलात, आवडलात,स्पर्शून गेलात, ते वास्तवाला थेट भिडण्याच्या वृत्तीमुळे. या वृत्तीमागे होती एक अदम्य जिज्ञासा... जगण्याबद्दलचे नितांत कुतूहल. या कुतूहलापोटी तुम्ही माणसांना बोलते करायचात आणि ऐकायचात तेव्हा वाटायचे, तुम्ही समोरच्याचा अनुभव आणि त्या अनुभवाआतला काळ स्वतःत रिचवत आहात. तुमचा स्वतःचाही एक काळ होता. आतला आणि भोवतालचा. त्या दोन्हीतले नाते तपासत, त्यातली स्थित्यंतरे अनुभवत तुम्ही त्यांचा ताळेबंद मांडत राहिलात. म्हणूनच जेव्हा तुम्ही माझा काळ हाच विषय घेऊन दीर्घ लेखन करायचे ठरवले, तेव्हा तुमच्या पिढीचा सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय संक्रमणाच्या उलथापालथीचा काळ दस्तावेज म्हणून आमच्या हाती लागणार याची खात्री झाली. पण..तुम्ही जिला नियती म्हणता तिने मधेच तुम्हांला गाठले आणि तुमचा काळ थांबला. तरीही तुम्ही आपल्या आरंभकाळा विषयी जे लिहिले आहे त्यातून तुमचे आमच्या काळातले असणे किती मोलाचे होते याचा प्रत्यय तुमच्या नसण्या नंतर अधिकच प्रखरपणे येतो आहे... तुमचा, जयंत पवार
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTe Diwas | तें दिवस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'हे अनुभवकथन आपल्याच समाजातील अंधांचे एक विश्व उजेडात आणतं. या विश्वात सुखदु:ख, आशानिराशा यांचे स्वाभाविक हेलकावे आहेत, विविध कलागुणांचे जोरदार आविष्कारही आहेत. हे लेखन सहानुभूतीच्या भाराने वाकलेले नाही, तर आशावादानं जगण्याची प्रेरणा देणारं आहे. मुख्य म्हणजे एका सर्वसामान्य गृहिणीच्या मातृत्वाचा परीघ कसा सहजपणे विस्तार पावत जातो, याचं प्रांजळ चित्रणही आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTeam Niwant (Andhatvavar Maat) | टीम निवांत (अंधत्वावर मात)
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartडोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामर्थ्याने पायातले साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...
All BooksTeen Hotya Pakshini | तीन होत्या पक्षिणी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart' ठाकरे म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दरारा असलेले नाव. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत शिवसेनेत फूट पडली अन् महाराष्ट्र नवनिर्माण सेना जन्माला आली. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले ! दोन सेना. दोन सेनापती. काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ? महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेThakare Viruddha Thakare | ठाकरे विरुद्ध ठाकरे
₹399.00Original price was: ₹399.00.₹299.00Current price is: ₹299.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartइनग्रिड बर्गमन. - जगाच्या दिलाची धडकन ! रॉबर्तो रोस्सेलिनी. - तिचा प्रतिभाशाली इटालियन दिग्दर्शक नवरा. सोनालिनी दासगुप्ता. - एक भारतीय बंगाली गृहिणी. प्रत्येक देखण्या स्त्रीच्या रसरसून प्रेमात पडणा-या आणि तेवढ्याच उत्कटतेनं प्रत्येक प्रेम नव्यानं जगणा-या रोस्सेलिनीच्या अजब प्रेमाची ही गजब कहाणी !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTichi Mohini | तिची मोहिनी
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartकुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर - आपल्यातून गेल्याला दोन वर्षे होतील. ते देहरूपाने अंतरले असले, तरी त्यांच्या साहित्यातून, आठवणींतून ते आपल्यात आहेतच. त्यांच्या साहित्यावर पुष्कळसे लिहिले गेले असले, तरी त्यांच्या समग्र साहित्यावरील चांगल्याशा परिचय-परामर्शात्मक ग्रंथाची उणीव भासतच होती. त्यांचे सलग असे प्रमाण चरित्रही नव्हते. ते काम प्राचार्य डॉ. के. रं. शिरवाडकरांच्या तो प्रवास सुंदर होता या ग्रंथाने केले आहे आणि ही उणीव चांगल्या प्रकाराने दूर केली आहे. केशवराव शिरवाडकर हे तात्यांचे धाकटे बंधू, त्यामुळे ग्रंथाला वैयक्तिक जिव्हाळयाचा ओलावा लाभला आहे आणि अधिकृतताही आली आहे. परंतु केशवराव हे उत्तम समीक्षकही आहेत. त्यामुळे या ग्रंथातील विवेचनात आवश्यक तेवढी अलिप्तता, तटस्थताही आली आहे. आत्मीयता आणि अलिप्तता यांच्या संमीलनाचा हा दुर्मिळ योग आहे. केशवरावांनी आपल्या पुस्तकामध्ये कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाचा बालपणापासून मागोवा घेतला आहे. सामाजिक जाणीव, एकाकीपणा, माणूसवेड, मिस्कीलपणा, कलंदर वृत्ती, संकोची स्वभाव, दूरस्थता, प्रेम, सहिष्णुता अशा विविध आणि पुष्कळ वेळा विरोधीही प्रवृत्तींचा सुंदर गोफ म्हणजे तात्यासाहेबांचे जीवन. त्याचे सुरेख चित्रण आपल्याला तो प्रवास सुंदर होता मध्ये मिळते. या ग्रंथामध्ये कुसुमाग्रजांचे चरित्रकथन आणि साहित्य-परामर्श एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की, त्यातून एक इंद्रधनूचा सुंदर गोफ विणला गेला आहे. हा ग्रंथ वाचताना कुसुमाग्रजांचे जीवन आणि साहित्य एकमेळाने उभे राहते आणि एका उदास आनंदाने चित्तवृत्ती भारून जातात. सु. रा. चुनेकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTo Pravas Sundar Hota | तो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज-वि.वा.शिरवाडकर जीवन आणि साहित्य)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमाझं आयुष्य मी मनापासून जगलोय, कृतार्थपणे जगलोय. अपवादानं कुणाला तरी क्लेश देत, पण बहुतांश आनंदानं जगलोय. माझ्या मुठीत मावतील एवढया आनंदाच्या दाण्यांचं वाटप मी कायम करीत आलोय.... आणि तरीही माझी मूठ भरलेलीच राह्यलीय, हे माझं अहोभाग्य ! माझ्या ओंजळीत जे पडलं, ते मी सुहास्य वदनानं स्वीकारलं. आणि ते बघण्यात मी इतका रमलो, की इतरांच्या ओंजळीत काय, पडलं, हे बघायची मला कधी फुरसतच मिळाली नाही. ईश्वराकडे मागणं एकच, तू केवळ माझ्यासाठीच रचलेलं हे जीवनगान मी जर मनापासून आळवलं असेल, तर मला तू पुन्हा जीवनाकडे पाठव, पुन्हा पुन्हा पाठव आणि मला पुन्हा नटाचाच जन्म दे आणि तोही याच मराठी भूमीत दे !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेToch Mee (Sankhipta) | तोच मी! (संक्षिप्त)
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'अलौकिक प्रतिभावंत विश्वशांतीचा प्रणेता दलितांचा कैवारी सत्याचा सांगाती अविरत आत्मसंशोधक अभिनव शिक्षणतज्ज्ञ... असे अनंतमिती व्यक्तिमत्त्व होते काऊंट लिओ टॉलस्टॉय यांचे. या प्रतिभाशाली महामानवाची जगावेगळी जीवनकथा. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTolstoy: Ek Manus | टॉलस्टॉय : एक माणूस
₹900.00Original price was: ₹900.00.₹675.00Current price is: ₹675.00. Save ₹225 Add to cart
">
Skip to content