चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartया आहेत आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा. शारीरिक अन् मानसिक व्याधींपासून दारुण दारिद्रय अन् टोकाच्या सामाजिक अवहेलनेपर्यंत अनंत अपेष्टा भोगलेले हे सारे जणू शापित यक्षच. मात्र स्वत: दु:ख, यातना भोगणा-या या सगळयांच्या मनी अवघ्या विश्वाचे आर्त प्रकटले आणि त्यांच्या अक्षरातून तेच कागदावर अवतरले. आपल्या प्रतिभेच्या तेजाने विश्वसाहित्याच्या नभात नक्षत्रांचे अढळ स्थान मिळवणारे सप्तर्षी आणि अरुंधती
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSaptarshi Ani Arundhati | सप्तर्षी आणि अरुंधती
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसंभाजी सोमा कदम. ज्योत्स्ना दत्तात्रेय जोशी. दोघांच्या वयांत पंचवीस वर्षांचं अंतर. ते प्राध्यापक, ती विद्यार्थिनी. त्यांची आर्थिक स्थिती बेताची, ती सुखवस्तू. पण यांतले कुठलेच बांध या सर्जनशील कलाकारांना एकत्र येण्यापासून रोखू शकले नाहीत. मग सुरू झाला त्यांच्या मनस्वी रंगीत चित्रांइतकाच धुंद सहजीवनाचा प्रवास! राजाच्या मृत्यूनं ताटातूट झालेल्या राणीनं मग उभं केलं हे उन्मुक्त सहजीवनाचं शब्दचित्र !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSar Ani Mee | सर आणि मी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartमुस्लिम नागरिक सरकारी अधिकारी बनतात आणि नियमानुसार कामगिरी बजावतात, त्यावेळी त्यांना बन्याचदा सरकारी मुसलमान असं काहीशा हेटाळणीच्या सुरात म्हटलं जातं. असं का? या पुस्तकात लेफ्टनंट जनरल जमीर उद्दिन शाह यांनी या चक्रावून टाकणाऱ्या पदवी चा खुलासा केलेला आहे. लेखकाच्या ७० वर्षांच्या समृद्ध आयुष्याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यांच्या कुटुंबानंच चालविलेल्या मदरशामध्ये त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर ते बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. सैन्यातली त्यांची कारकीर्द चाळीस वर्षांची झाली. १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला. त्याखेरीज गुजरातमध्ये सन २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळितकांडानंतर उसळलेल्या दंगली शमविण्याची जबाबदारी सैन्याच्या ज्या डिव्हिजनला दिली गेली, तिचे कमांडर शाह हे होते. त्याबद्दलच्या प्रकरणामध्ये लेखकांनी पोलिस, निमलष्करी दल आणि सेना दल यांच्या भूमिकांबद्दलची त्यांची मतंही स्पष्टपणे मांडली आहेत.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSarakari Musalman | सरकारी मुसलमान
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cart'एक होता तडफदार ब्रॅरिस्टर. वल्लभभाई पटेल नावाचा. कावेबाज युक्तिवाद परजून खटले जिंकू पाहणारा. खूप पैसे कमवून झटपट श्रीमंत होऊ इच्छिणारा. पण योगायोगानं त्याची गाठ पडली एका अवलियाशी. मोहनदास करमचंद गांधींशी आणि मग चमत्कार घडला. वल्लभभाई बदलले. त्यांनी वकिली सोडली, अहिंसक सत्याग्रहाचं नेतृत्व स्वीकारलं आणि दीनदुबळया, असाहाय्य शेतक-यांचे ते तारणहार सरदार बनले. त्या क्रांतिकारक परिवर्तनाची ही अनोखी कथा. राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या मूळ हिंदी कादंबरीचा हा सरस भावानुवाद. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSardar | सरदार
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartमुलांच्या छंदांना एखाद्या रोपटयाप्रमाणे जपायचं असतं. रेमंडला तर जगावेगळा छंद होता.... साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या आईवडलांनी त्याला रोखलं नाही.... आणि रेमंडचा सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स झाला. अभ्यासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या साप या प्राण्याचा रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची सुंदर निर्मिती केली.... 'एक होता कार्व्हर' या गाजलेल्या ग्रंथाच्या लेखिका वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट.... एका रसाळ आणि सुबोध शैलीत.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Add to cart -
Sale! Add to cartरवींद्र पिंगे! गेली ५० वर्षं को-या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक. अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर. सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण. परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झ-याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं. रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार, ‘सर्वोत्तम’ नजराणा तुम्हां वाचकांसाठी—
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSarvottam Ravindra Pinge | सर्वोत्तम रवींद्र पिंगे
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartफादर दिब्रिटो - ख्रिश्चन साधना-धर्म निष्ठेने अनुसरणारे आणि महाराष्ट्रधर्म जिवापाड जपणारे विश्वाचे नागरिक. त्यांनी मराठी भाषेच्या अंगणात ललित साहित्याचे मळे फुलवले. धर्मांची डोळस चिकित्सा केली आणि भक्तीला सामाजिक कार्याची जोड दिली. देशातील धर्मकारण निष्पक्षपणे विश्लेषले आणि पर्यावरणरक्षणासाठी लढे उभारले. सामाजिक अन्यायाला वाचा फोडली आणि राजकीय पुंडशाहीविरुद्ध कंबर कसली. मऊ मेणाहुनी विष्णुदास, प्रसंगी वज्राहुनी कठोर, अशा या साहित्यिकाच्या प्रथम स्मृतिदिनी सादर होत आहे सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो
All BooksSarvottam Va Samakaleen Father D’Brito | सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cart'आयुष्यात बरेच चढउतार आले. त्यामुळे आयुष्य अनुभवसंपन्न झालं, शिवाय कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याचं कौशल्य अंगी बाणलं. बँकिंग क्षेत्रात, मग विमाक्षेत्रात आणि नंतर खासगी म्युच्युअल फंड कंपनीत काम केल्याने आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष अनुभव मिळाला. दिलेलं काम निष्ठापूर्वक आणि न कुरकुरता करणं, आपल्या कामाचा ठसा उमटवणं, तेच काम वेगळ्या तऱ्हेने अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल का याचा शोध घेणं आणि निर्णय घेण्यात दिरंगाई न दाखवता विवेकबुद्धीला स्मरून धडाडीचे निर्णय घेणं यांत माझा हातखंडा होता. ऑफिसचं काम करताना कठोर कारवाई करणे गरजेचं दिसलं, तिथे ती करताना हयगय केली नाही आणि कुणाचा मुलाहिजाही ठेवला नाही. कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीने शरीर पोखरलं. एकदा, दोनदा, नव्हे तीन वेळा. तरीही पुन्हा नव्या उमेदीने आणि उत्साहाने नव्या प्रकारच्या कामात झोकून दिलं. कॅन्सरची भीती जनमानसात खोलवर रुजली आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना मानसिक आधाराची खूप गरज असते. मला असे कोणी रुग्ण कळले की मी आवर्जून त्यांना भेटतो. माझं त्या व्याधीतून बाहेर पडणं त्यांना जगण्याची नवी उमेद देतं. नीलेश साठे अर्थविश्वातील आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रावर ठसा उमटवणाऱ्या कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीशी यशस्वी झुंज देणाऱ्या नामवंत अर्थतज्ज्ञाचं वेधक आत्मकथन. साठे उत्तरांची कहाणी '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSathe Uttarachi Kahani | साठे’ उत्तराची कहाणी
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cart'यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते होयबा झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर. ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र. सत्तेच्या पडछायेत '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSattechya Padachhayet | सत्तेच्या पडछायेत
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'हे आत्मकथन आहे जगातल्या अनेक गोष्टींना एखाद्या उत्साही मुलीच्या अवखळ कुतुहलाने सामोरे जाणाऱ्या एका प्रतिभावंत मनस्विनीचे ! आकाशवाणीपासून दूरचित्रवाणीपर्यंत बालनाटय अन् प्रायोगिक रंगभूमीपासून जास्वंदी, सख्खे शेजारी अशा गाजलेल्या नाटकांपर्यंत अनोख्या डॉक्युमेंट्रींपासून चष्मेबद्दूर, कथा, दिशा, स्पर्श, साज अशा अनवट चित्रपटांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्वत:ची अमिट छाप उमटवणारी ही बहुआयामी प्रतिभावान कलाकार : सई परांजपे मिस्कील आणि मनस्वी प्रेमळ आणि फटकळ नर्मविनोदी आणि स्पष्टवक्ती. आग्रही आणि पारदर्शी. सईंच्या व्यक्तिमत्त्वाचे असे विविध पैलू उलगडणारे आत्मकथन सय
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSay – Maza Kalapravas | सय – माझा कलाप्रवास
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart
">
Skip to content