तत्वज्ञान / व / धर्म
-
Sale! Add to cart'संत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे... तुकारामांच्या अभंगांमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे जे प्रतिबिंब पडले आहे, त्यावरून त्यांच्या जन्म- निर्याण शकांची निश्चिती करणारा हा प्रबंध त्यांच्या समर्थ रामदासांशी व शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटींबाबतही साधकबाधक चर्चा करतो. तुकारामांचा आध्यात्मिक जीवनविकास कसा होत गेला, त्यांना कोणकोणते पारमार्थिक अनुभव आले, त्यांना भक्तिपंथ बहु सोपा का वाटला, याचा तौलनिक अभ्यास या ग्रंथात आढळतो. त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीचे मुद्देसूद विवेचन जसे आपल्यासमोर येते, तसाच त्यांच्या अभंगांचा साहित्यशास्त्रीय आस्वादही घेतला जातो. बाबांच्या शिकवणुकीवर, तत्त्वज्ञानावर आणि कवित्वावर देशीविदेशी टीकाकारांनी घेतलेल्या वेगवेगळया आक्षेपांची यथोचित दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ अखेरीस त्यांच्या अवतारसमाप्तीच्या पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकतो. तुकारामांच्या अभंगांची विविधांगी चिकित्सा करणा-या या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे त्यांच्या सदेह वैकुंठगमनाची पातंजल योगसूत्रांच्या आधाराने केलेली उकल. सिद्धिसामर्थ्याने आपला देह आपल्या इच्छेनुसार पंचमहाभूतांत विलीन करून घेता येतो, असे स्पष्टपणे सांगणारी सूत्रे पातंजलयोगशास्त्रात आहेत, हे अभ्यासकांना पूर्वीपासूनच माहीत होते. तथापि तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाची आणि पातंजलयोगसूत्रांची सांगड घालण्याची प्रायोगिक कल्पकता यापूर्वी कुणी दाखवली नव्हती. आपल्याला ॠद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असल्याची आपल्या अभंगांमधून असंख्य वेळा ग्वाही देणा-या तुकारामांच्या वैकुंठगमनाची अशी उपपत्ती लावून दाखवणारे साधार विवेचन हे प्रा. डॉ. द. वा. पटवर्धन यांच्या या प्रबंधाचे पताकास्थान आहे. ज्या प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाने प्रा. पटवर्धन यांना विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) ही पदवी प्रदान केली, तो हा प्रबंध आता संतसाहित्याच्या अभ्यासकांना आणि भाविकांना उपलब्ध होत आहे. तुकारामविषयक मराठी साहित्याच्या दालनात मोलाची भर घालणारा हा ग्रंथ त्या संतश्रेष्ठाबद्दलचे आपले आकलन अधिक समृद्ध करणारा ठरेल, यात काहीच शंका नाही.
तत्वज्ञान / व / धर्मAbhang Tukyache (Chikitsatmak Abhyas) | अभंग तुकयाचे (चिकित्सात्मक अभ्यास)
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartमी नास्तिक आहे. संदेहवाद्यांसारखा अर्घवट नास्तिक नव्हे, तर संपूर्ण नास्तिक. तरीही मी अश्रद्ध नाही. माझी विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. मी त्यांचा आणि केवळ त्यांचाच अनन्यभक्त आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेही कंठात गहिवर दाटतो, डोळ्यांत पाणी साचते. या वारकरी संतांच्या साहित्यातून मला विठ्ठलाचे जे दर्शन घडले ते शब्दरूपाने साकार करणे, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट. जगात असा दुसरा देव नाही !
तत्वज्ञान / व / धर्मAisa Vithevar Dev Kothe | ऐसा विठेवर देव कोठे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
All Books
Chandravati Ramayan | चंद्रावती रामायण
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cartकोणत्याही ग्रंथाचे रहस्य समजून घ्यायचे असेल, तर त्या ग्रंथाविषयीचे आणि ग्रंथकारासंबंधीचेही सर्व पूर्वग्रह विसरूनच तो ग्रंथ वाचायला हवा. ग्रंथ आपल्याशी काही बोलू इच्छितो आणि आपण त्याला मोकळेपणाने बोलू दिले पाहिजे. ग्रंथ आपल्याशी बोलत असताना तो व आपण यांच्यामध्ये तिस-याला येऊ देता कामा नये. तसा कोणी आला; तर ग्रंथाशी आपला जो संवाद व्हायला हवा, त्यात विक्षेप येतो. ज्ञानेश्वरीच्या वाचनाच्या वेळी जे पूर्वग्रह माझ्या वाचनात विक्षेप आणीत होते, ते बाजूला सारल्यावर माझे वाचन अधिक फलदायी ठरले. हे पूर्वग्रह ज्ञानेश्वरीचे स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य यांविषयीचे.
तत्वज्ञान / व / धर्मGyaneshwari | ज्ञानेश्वरी स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartईशावास्य उपनिषद् म्हणजे सर्वांत महत्त्वाचं उपनिषद्. बाकी सर्व धर्मग्रंथ अचानक नष्ट झाले आणि केवळ या उपनिषदातला पहिला मंत्र हिंदूंच्या स्मरणात राहिला, तरी हिंदू धर्म चिरंतन टिकेल, असं महात्माजींनी म्हटलं होतं. त्या उपनिषदाचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी एका संवेदनशील कवयित्रीनं केलेल्या वैचारिक प्रवासाचा आलेख... ईशावास्यम् इदं सर्वम्... एक आकलन-प्रवास '
तत्वज्ञान / व / धर्मIshawasyam Idam Sarvam…Ek Aakalan Prawas | ईशावास्यम् इदं सर्वम्… एक आकलन-प्रवास
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'भारताय जीवनधर्माचा प्राणस्वर स्खलनशील माणूस अन् चिरंतन मूल्ये यांचा संघर्ष मंगेश पाडगांवकर कथारूपात सांगत आहेत तीन हजार वर्षांची अदभुत रसयात्रा
तत्वज्ञान / व / धर्मKatharup Mahabharat (Khanda 1 Ani 2) | कथारूप महाभारत (खंड-१ व २)
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartगेल्या शंभरेक वर्षांत महानुभावांच्या साहित्यावर सांप्रदायिक आणि संप्रदायिकेतर संशोधक-अभ्यासकांकडून विपुल लेखन झाले असले, तरी महानुभावीय सांप्रदायिक व्याख्यानपद्धती आणि आधुनिक महानुभावीय व्याख्यानपद्धती या उभय पद्धतींचे सविस्तर अध्ययन- अध्यापन झालेले नाही. प्रा. बापट यांचा प्रस्तुत दोन भागांचा ग्रंथ त्याच्या नावाप्रमाणे महानुभाव वाङ्मयाच्या व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन आहे. महानुभाव संप्रदायाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची इतकी सांगोपांग चर्चा करणारा दुसरा ग्रंथ माझ्या अवलोकनात नाही. व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन करताना व्याख्यानांची म्हणजेच साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची चर्चा आपोआपच होऊन गेली. म्हणजेच या ग्रंथाची फलश्रुती दुहेरी आहे. संप्रदायाच्या विशाल साहित्याचा व सखोल तत्त्वज्ञानाचा परिचय होणे आणि या परिचयातून व्याख्यानपद्धतीचेही आकलन होणे - हे दोन्ही प्रवाह ग्रंथामध्ये एकवटले आहेत इतके म्हणण्याइतपत परस्परांत मिसळले आहेत, ती गुंफण हेच एक या ग्रंथाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होऊन बसले आहे. डॉ. बापट यांचा ग्रंथ म्हणजे महानुभावांच्या व्याख्यानवाङ्मयाचे एक महाव्याख्यानच ! डॉ. सदानंद मोरे
All BooksMahanubhav Part 1 Ani 2 | महानुभाव वाड.मय भाग १ व भाग २
₹3,000.00Original price was: ₹3,000.00.₹2,250.00Current price is: ₹2,250.00. Save ₹750 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreआजच्या जागतिकीकरणाच्या उलथापालथीत सकस मन घडवण्यासाठी 'मनाच्या श्लोकां'ची नितांत गरज आहे. हल्ली शाळाशाळांमधून मूल्यशिक्षणाचे तास सुरू झाले आहेत. त्यासाठीदेखील 'मनाचे श्लोक' उपयुक्त ठरण्यासारखे आहेत. मनाला बोध करण्यासाठी समर्थ रामदासांनी संवादाचे माध्यम निवडले. हा संवाद त्यांनी मनाच्या प्रत्येक श्लोकातून केला. कधी मनाला आंजारून-गोंजारून, तर कधी मनाला दटावून; कधी मनाला थापटून-थोपटून, तर कधी मनाला समजावून... समर्थांनी मनाशी सुसंवाद साधायचा सत्त्वसंपन्न प्रयत्न केला. मनाला चांगल्या गोष्टींकडे वळवण्यासाठी समर्थांनी या श्लोकांतून काही साध्या-सोप्या युक्त्यासुध्दा सांगितल्या. समर्थांच्या त्या संस्कारांचे सारसंचित नव्या संदर्भात उलगडून दाखवणारे हे भावचिंतन...
तत्वज्ञान / व / धर्मMananchya Shokache Marma | मनाच्या श्लोकां’चे मर्म
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more -
Sale! Add to cart'गीता-ज्ञानेश्वरीतील काही विधाने आजच्या आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशी आश्चर्यकारक साम्य दाखवतात. या विधानांना वैज्ञानिक आधार नाही, पण म्हणूनच ती अधिक कुतुहलजनक ठरतात. अध्यात्म विरुद्ध विज्ञान असे कृत्रिम द्वंद्व उभारून वितंडवाद घालत बसण्याऐवजी या विधानांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल का ? विज्ञानाने दाखवलेल्या मार्गाने भौतिकशास्त्रातील एका वैज्ञानिकाने घेतलेला गीता-ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाच्या काही अंगांचा वेध म्हणजे न्यूटनांते वाट पुसतु '
तत्वज्ञान / व / धर्मNutonante Vat Pusatu | न्यूटनांते वाट पुसतू
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आणि त्यांना दूर... ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात डांबण्यात आले. ती शिक्षा लोकमान्यांना क्लेशदायक ठरली, हे तर खरेच; पण सुदैवाने त्या एकांतवासात अवघ्या पाच महिन्यांच्या अवधीत त्यांनी गीतारहस्य हा अदभुत ग्रंथ लिहून पूर्ण केला. निष्काम कर्मयोग हाच गीतेचा संदेश आहे, हे आपले मत ठासून मांडणारा लोकमान्यांचा हा ग्रंथ मराठी समाजाच्या अभिमानाचा विषय ठरला आहे. तथापि दुर्दैवाने तो गहनगंभीर ग्रंथ सर्वसामान्यांना समजून घ्यायला मात्र कठीण जातो. साहजिकच लोकमान्यांचा संदेश सामान्य वाचकांपर्यंत पोचू शकत नाही. त्या संदेशाचे मोठेपण आणि सामान्य वाचकाची आकलनशक्ती यांमधील दरी सांधण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या एका व्यासंगी चिंतकाने त्या महान ग्रंथाचा केलेला हा सुबोध संक्षेप...
तत्वज्ञान / व / धर्मSaar Geetarahasyache | सार गीतारह्स्याचे
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content
