मार्गदर्शनपर
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreएक्सेल संगणकाच्या विश्वातला तत्पर मदतनीस त्याची कार्यक्षमतेचा अफाट. किचकट आकडेमोड क्षणार्धात पुरी करणारा. नेमकी उत्तरं झटपट देणारा. तुमचा आज्ञाधारक साहाय्यक. कोणताही शास्त्रीय वा तांत्रिक बागूलबुबा उभा न करता एक्सेलच्या सगळ्या करामतींचा साध्या-सोप्या उदाहरणांद्वारे हसत-खेळत करून दिलेला परिचय. 'क-क-कॉम्प्यूटरचा' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक रवींन्द्र देसाई यांनी जवळच्या मित्राच्या भूमिकेतून केलेलं सुबोध मार्गदर्शन.
मार्गदर्शनपरNavya Swarupat Excel | नव्या स्वरूपात एक्सेल
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cart' सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व कॉर्पोरेट विश्वालाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये - डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण टीम त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. वर्क फ्रॉम होमच्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : हेडहंटर! गिरीश टिळक या निष्णात हेडहंटरचे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!'
मार्गदर्शनपरNipun Shodh | निपुण शोध
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartदीपक पटवर्धन या विशीतील तरुणाने स्वरूपानंद पतसंस्थेसाठी स्वत:ला झोकून दिले आणि दहा हजार रुपयांवर सुरू झालेला प्रवास आज ६०० कोटींच्या पार नेला; तो विश्वासार्हता, कल्पकता आणि चोख आर्थिक शिस्तीच्या जोरावर. याच गुणांच्या जोरावर राजकारण आणि वाचक चळवळ यातही यशस्वी मुशाफिरी करून दाखविली. सार्वजनिक जीवनात नेकीने आणि नेटाने केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे अनुभव कथन. या प्रांतातलं तुमचं शुद्ध-स्वच्छपण हे रत्नागिरीकरांना माहीत आहे, याची नोंद पक्षाच्या ‘सोशल मीडिआ टीम'नं घेतलेली आहे. तुमच्या या चारित्र्यसंपन्न प्रतिमेचा सार्वजनिक कार्याला उपयोग व्हावा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ‘कोकणात सहकार चळवळ कुठे आहे?’ असा जो प्रश्न केला जातो, त्याला स्वरूपानंदनं आदर्शरूपे उत्तर दिलंय. तिच्या यशाचं ‘दीपक पटवर्धन’ हे खरं रहस्य आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार
All BooksSahakar Swaroopa | सहकार स्वरूपा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'भारतीय सैनिक. शौर्य, निर्धार अन् निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक. सियाचीनच्या उणे पन्नास अंशापासून रणरणत्या वाळवंटाच्या अधिक पन्नास अंश सेंटिग्रेड तापमानापर्यंत, असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा हा सैनिक. देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा जागता पहारा असतो, म्हणून तुम्ही आपापल्या उबदार घरट्यात सुखाची झोप घेऊ शकता. दगाबाज दुश्मनाचा वार तो आपल्या निधड्या छातीवर झेलतो, म्हणून तुम्ही जल्लोषात अन् उत्साहात उत्सव अन् उरूस, सण अन् समारंभ साजरे करू शकता. असा हा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा, कर्तव्यकठोर निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा, तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक
मार्गदर्शनपरSainik | सैनिक (मराठी)
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'आजमितीस भारत हा तरुणांचा देश म्हणून मिरवतो आहे, पण आणखी तीस-पस्तीस वर्षांनी तो वृद्धांचा देश होऊ लागेल. त्या वेळी त्या वृद्धांचे संगोपन करायला देशाने काही व्यवस्था आधीपासूनच विकसित करायला हव्यात, की नकोत? या व्यवस्था विकसित करायच्या, तर त्यासाठी लागणारा पैसा आजच्या तरुणांकडून कररूपात घ्यायला हवा. पण आजचे खूपसे तरुण बेरोजगार असतील, तर ते स्वत:च्या आणि इतरांच्याही वृद्धसंगोपनाची तरतूद कशी करणार? प्रश्न जटिल आहे. शिवाय तो फक्त भावनिक, कौटुंबिक नाही, तर राष्ट्रीय आणि आर्थिकही आहे. या जटिल प्रश्नावर एक उतारा म्हणजे आजचे वृद्धच आजच्या तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे निमित्त होऊ शकतात. त्यासाठी गरज आहे वृद्धसंगोपनाकडे केवळ भावनिक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून नाही, तर आर्थिक दृष्टिकोनातूनही बघण्याची. कसे, ते समजावून सांगणारे आगळेवेगळे पुस्तक.'
मार्गदर्शनपरSanjavat | सांजवात
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartशांत मन - The Secrert Of Life हे पुस्तक आपल्याला मन समजून घेण्याचा आणि आयुष्य अधिक संतुलित व आनंदी बनवण्याचा प्रभावी मार्ग दाखवते. या पुस्तकात दैनंदिन जीवनातील गोंधळ, ताण, अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यामध्ये मन कसे अस्थिर होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, याचे वास्तववादी उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे. पुस्तकातील प्रत्येक अध्याय वाचकाला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो.
All BooksShant Maan (The Secret Of Life) | शांत मन (The Secret of Life)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartशिदोरी म्हणजे संचित. माणसाच्या सोबत असलेली हक्काची मीठ - भाकर. आपल्या आयुष्यातील उत्कट, कातर अनुभवांनी दिलेलं शहाणपण. जगण्याच्या प्रवासात आलेल्या घटनांनी दिलेली सार्थ शिकवण हीसुद्धा शिदोरीच. कधी संदेशाच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात. शिदोरी भूक भागवतेच, पण ती तुम्हाला आधार देते, बळ देते, ऊर्जा देते, चैतन्य देते. विचारांची शिदोरी पडताना सावरते, गोंधळताना स्थिर ठेवते, निराशेत मनावर फुंकर मारते आणि अतिविश्वासाच्या, अतिउन्मादाच्या वेळी आपल्याला लगामही घालते. हातांचे पंख करण्याची ताकद शिदोरीत असते , काट्यांकुट्यांतून वाट काढण्याचं शहाणपण शिदोरीत असतं आणि अतिउत्साहात भरारी घेण्याची अतिशयोक्त रिस्क घेताना थोपवण्याचं चतुरपणही शिदोरीत असतं. ऊर्जेनं भरलेली, सकारांनी गजबजलेली, आत्मविश्वासानं सजवलेली आणि बंधुभावनेनं बहरलेली. विचारांची भूक लागलेल्यांना पोटभर देणारी.. या पुस्तकाचं पान न् पान उलगडताना, डॉ. सुरेश हावरे यांचा तेजानं भरलेला, मदतीच्या भावनेनं कृपामय झालेला, साऱ्या बांधवांसाठी उत्कर्षाचं, उद्धाराचं पसायदान मागणारा 'हसतमुख चेहरा' दिसत राहतो, ही या विचारांची एक उजवी बाजू आहे. अरुण म्हात्रे
All BooksShidori Part2 | शिदोरी भाग २
₹230.00Original price was: ₹230.00.₹173.00Current price is: ₹173.00. Save ₹57 Add to cart -
Sale! Add to cartअनघड शैलीतले हे पुस्तक वाचताना आपल्याला गेल्या पिढीतील एक कलंदर, जिद्दी कार्यकर्ता आणि त्याच्या ध्यासात तितक्याच तन्मयतेने सहभागी होणारी त्याची पत्नी भेटते. डोमरीसारख्या आडवळणी गावात 'गुरुकुल' चालवण्याचा सुदामकाका आणि सिंधूमामींनी घेतलेला निर्णय हिशोबी शहाणपण बाळगणाऱ्या जगाला पटणे अवघड आहे. पण नवनिर्मितीसाठी बऱ्याचदा हिशोबी शहाणपणापेक्षा बेहिशोबी वेडेपणाच गरजेचा असतो, याची आठवण हे पुस्तक वाचताना परत एकदा होते. नीलेश निमकर
All BooksShikshnachya Ovya | शिक्षणाच्या ओव्या
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआपली मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, यशस्वी व्हावीत... असं कुठल्या पालकांना वाटत नाही ? पण हे साधायचं कसं, हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे. जग झपाटयानं बदलतं आहे, जीवनशैली बदलते आहे. टीव्ही, कॉम्प्यूटर, इंटरनेट, मोबाईल... अशा माध्यमांच्या प्रभावात आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात वाढणा-या आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे ? आजची मुलं ऐकतच नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची ? त्याहीपुढे जाऊन पोटच्या पोरांना प्रेम देण्याइतकी फुरसतही आज पालकांकडे नसेल, तर...? पालक असणं वेगळं आणि पालक होणं वेगळं ! पालक 'होणं' हे एक 'घडणं' असतं. आजच्या काळात पालक 'होणं' म्हणजेच 'सुजाण पालक' होणं. दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं पालकत्व पेलत असतानाच, पालक असण्यातला आनंदही अनुभवता येणं म्हणजे 'सुजाण पालक' होणं ! 'सुजाण पालकत्वाचा' हा मंत्र सुलभ शैलीत उलगडून सांगणारं हे मराठीतलं अद्ययावत असं 'गाईड' पालकांच्या संग्रही असायलाच हवं. पूर्वीच झालेल्या किंवा होऊ घातलेल्या... सर्वांच्याच !
मार्गदर्शनपरSujan Palak Vhava Kasa? | सुजाण पालक व्हावं कसं?
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart
">
Skip to content