विज्ञान
-
Sale! Add to cart'साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट - बिग बँग ! त्यातून जन्मलेलं असीम विश्व ! लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका ! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं ! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी... कथा हबल दुर्बिणीची...
विज्ञानKatha Habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञानात कुणी छोटा-मोठा, खालचा-वरचा नाही. नवीन कल्पनांचा झरा कुठेही फुटू शकतो. न सुटणारी कोडी एखादा पोरच सोडवून जातो. विज्ञानाचा प्रवाह कुठूनही कुठेही वाहू शकतो. वैज्ञानिकांनी, प्राध्यापकांनी, विज्ञानलेखकांनी विज्ञानशिक्षण शिकवायचं, लोकांसमोर मांडायचं आणि विद्यार्थ्यांनी, सामान्य वाचकांनी त्यांच्यापासून फक्त शिकायचं या समजुतीला जोरदार तडा देणा-या अनुभवांचं हे कथन. विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित माणूसही संशोधन करू शकतो, ज्ञान-विज्ञानात मोलाची भर टाकू शकतो. हे केवळ इतिहासातच घडलं आहे असं नाही; तर आजही नित्य नेमानी घडू शकतं, घडत आहे. मोठमोठ्या उपकरणांनी समृद्ध प्रयोगशाळा असतात विद्यापीठे अन् संशोधनसंस्थांमध्ये. सामान्य माणसाची प्रयोगशाळा आहे कट्टा . प्रत्येकाला सर्वकाळ आणि सर्वत्र उपलब्ध असलेली. अशा कट्टा प्रयोगशाळेतून विज्ञानक्षेत्र अधिक निकोप आणि लोकाभिमुख करणारे
All BooksKatta Model | कट्टा मॉडेल
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळ्या विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे. एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. पद्मविभूषण वसंत गोवारीकर विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणा-या मॅक्स्वेल ची ओळख किती जणांना असेल? विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगड्याचा आणि त्या घडवणा-या किमयागारां चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते. अतीश दाभोलकर (भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक) '
विज्ञानKimayagar (Saycom) | किमयागार (सायकॉम)
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब ! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळ्या विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे. एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. पद्मविभूषण वसंत गोवारीकर विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणा-या मॅक्स्वेल ची ओळख किती जणांना असेल ? विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगड्याचा आणि त्या घडवणा-या किमयागारां चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार ! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते. अतीश दाभोलकर (भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक)
विज्ञानKimayagar | किमयागार
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more -
Sale! Add to cartकृष्णविवर हा शब्द काव्यात्म वाटला तरी ती संकल्पना वैज्ञानिक आहे. ती खगोलशास्त्रीय संकल्पना बरीच गुंतागुंतीची आणि किचकट असल्यामुळे समजून घ्यायला अवघड आहे. त्या संकल्पनेशी संबंधित गणिती सूत्रे म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर दुर्लघ्य पर्वतच. पण असे क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून देण्याची हातोटी ज्या मोजक्या मान्यवर मराठी लेखकांना साधली आहे, त्यांच्यात प्रा. मोहन आपटे यांचा आवर्जून समावेश करावा लागेल. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे कृष्णविवराबद्दलची श्वेतपत्रिकाच आहे, असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही. कृष्णविवर म्हणजे काय, या प्रश्नापासून कृष्णविवराच्या निर्मिती-स्थिती-लय या त्रिविध अवस्था असतात का, या प्रश्नांपर्यंत अनेक प्रश्नोपप्रश्नांची सविस्तर, साधार उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. सृष्टीच्या निर्मितीचे गूढगुंजनात्मक कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात असणा-या असंख्य खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनाचे निष्कर्ष-दुवे एकमेकांशी जोडून कृष्णविवराचा रहस्यभेद करणारी ही सुसंगत कथा प्रा. आपटे यांनी जिज्ञासू वाचकांना सांगितली आहे. गणिती सूत्रे ज्यांना क्लिष्ट वाटतात त्या वाचकांना गणितावर आधारित खगोलशास्त्रीय संकल्पना निव्वळ विवेचनातून समजावून देण्याचे अवघड काम यशस्वीपणे त्यांनी पार पाडले आहेच, पण तशा सूत्रांची भीती न बाळगणा-या जिज्ञासूंसाठी कृष्णविवरच्या संकल्पनेशी निगडित असणारी काही सोपी गणिती सूत्रेही त्यांनी मुद्दाम पुस्तकाच्या शेवटी दिली आहेत. जिज्ञासूंबरोबर जाणकारांनीही आवर्जून वाचावे आणि दाद द्यावी, असे हे पुस्तक.
विज्ञानKrishnavivar | कृष्णविवर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'तरुण मित्र-मैत्रिणींनो, आपलं करिअर विज्ञान-संशोधनात करायचं ठरवताय? कोणते मार्ग अनुसराल? कोणते आनंद अन् निराशा तुमच्या वाटयाला येऊ शकतील? हे करिअर तुम्ही का निवडायला हवं? यश मिळवण्यासाठी काय करायला हवं? मुंग्या या विषयावर अत्यंत मूलभूत संशोधन करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ : डॉ. एडवर्ड ओ. विल्सन या प्रतिभावान शास्त्रज्ञानं स्वत:च्या जीवनातील घटना, आगळेवेगळे छंद आणि संशोधनातील अनुभव यांच्या आधारे मित्राच्या जिव्हाळयानं तरुणाईशी साधलेला संवाद म्हणजे हे पत्ररूप मार्गदर्शन. '
विज्ञानLetters To A Young Scientist | लेटर्स टु अ यंग सायंटिस्ट
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartचित्तो जेथा भोयोशून्यो या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणाया या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय,सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
All BooksMahajalache Muktayan | महाजालाचे मुक्तायन
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartअणुभट्टी आणि अणुबाँब या एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक जग उजळवणारी तर दुसरी राखरांगोळी करणारी. अणुमध्ये दडलेली अमाप ऊर्जा, त्या ऊर्जेवर नियंत्रण राखण्याचे तंत्र, अणुभट्ट्यांचे कार्य, त्यांच्या प्रकलपांमध्ये दडलेले धोके, घातक अणुकचरा आणि त्याच्या विल्हेवाटीची समस्या अणुशास्त्रातील अशा विविध पैलूंची सुबोध ओळख करून देणारे
विज्ञानMala Uttar Havay : Anushakti | मला उत्तर हवंय! : अणुशक्ती
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartअंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे. गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक. पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ, यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणा-या टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा हे सारे समजावून देणारे गणित : भाग १
विज्ञानMala Uttar Havay : Ganit Part 1 | मला उत्तर हवंय! : गणित : भाग १
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartअंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे. गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक. पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ, यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणा-या टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा हे सारे समजावून देणारे गणित : भाग १
विज्ञानMala Uttar Havay : Ganit Part 2 | मला उत्तर हवंय! : गणित : भाग २
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
">
Skip to content