विज्ञान
-
Sale! Add to cartमाणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणा-या एका अद्भुत यंत्राची चित्तथरारक कथा. वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची, यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची, सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही. असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही...
विज्ञानNabh Akramile | नभ आक्रमिले
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreतारा कसा जन्मतो ? कसा प्रकाशतो ? पृथ्वीवरच्या जीवनविकासाला कारणीभूत असणारा आपला सूर्य केव्हा जन्मला ? आणखी किती वर्षे तो असाच तेजाने तळपणार ? ता-यांचे तेज संपले की त्यांचे काय होते ? कसा असतो त्यांचा शेवट ? पल्सार म्हणजे काय ? कृष्णविवरात काय दडले आहे ? गूढ तारकाविश्वाचा वैज्ञानिक वेध घेणारे खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना सोप्या आणि रंजक पध्दतीने उकलून दाखवणारे नभात हसरे तारे '
विज्ञानNabhat Hasre Tare | नभात हसरे तारे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartकॅमे-याचा शोध लागला, म्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. गुगल अर्थवरून गिरी-पर्वत दिसले, म्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही.. तसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, तंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला; तरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे वापरून आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही कमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि सौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची भुरळ कायम राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायलाच हवं असं – नक्षत्रविहार
विज्ञानNakshatravihar | नक्षत्रविहार
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी नॅनोतंत्रज्ञानावर मराठीत पुस्तक लिहिलं आहे, हे कळल्यावर मला फार आनंद झाला. भारतीय भाषांमध्ये अशी पुस्तकं निघाली, तर नॅनोतंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी त्यांचा अतिशय फायदा होईल. प्रो.सी.एन. आर. राव नॅशनल रिसर्च प्रोफेसर, लायनस पॉलींग रिसर्च प्रोफेसर नॅनोटेक्नॉलॉजी हे जीवन पूर्णपणे बदलून टाकणारं तंत्रज्ञान आहे. या खिळवून ठेवणा-या पुस्तकात नॅनोटेक्नॉलॉजीचे जादुई परिणाम अतिशय ओघवत्या आणि सोप्या भाषेत सांगितलेले असूनही त्यातली अचूकता वाखाणण्याजोगी आहे. हे पुस्तक वाचून मी स्वत: अनेक गोष्टी शिकलो. डॉ.रघुनाथ माशेलकर सीएस्आयआर भटनागर फेलो प्रेसिडेंट, ग्लोबल रिसर्च अलायन्स, एनसीएल, पुणे एकविसाव्या शतकात नॅनोसायन्स हे वेगाने पुढे येणारे तंत्र आहे. हा कठीण विषय, सोपी सोपी परंतु लिखाणास साजेशी अशी खूप उदाहरणे देऊन या दोघांनी तो समजावयास सोपा केला आहे. भविष्याचा वेध घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. डॉ.अरुण निगवेकर माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग; माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ; संस्थापकीय अध्यक्ष, नॅक नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर वेगवेगळया प्रकारांनी पडणार असल्यामुळे या तंत्रज्ञानाची माहिती समाजातल्या सगळया घटकांनाच होणं गरजेचं आहे. श्री.अच्युत गोडबोले आणि डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेलं हे पुस्तक ही गरज योग्य रीतीनं भागवतं. डॉ.सतीशचंद्र ओगले रामानुजम फेलो सीनियर सायंटिस्ट, एनसीएल, पुणे नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान हा विषय रंजकपणे सांगण्याचे आव्हान अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी अत्यंत समर्थपणे झेलले आहे. शास्त्रीय गाभ्याला धक्का न लावता सर्वांना समजेल अशा भाषेत या तंत्रज्ञानाच्या मागील मूळ तत्त्वे त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. डॉ. दिलीप कान्हेरे प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ '
विज्ञानNanoday | नॅनोदय
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'खरा प्रतिभासंपन्न गणिती आहे, निसर्ग. पानांत आणि फुलांत, पशूंत आणि पक्ष्यांत, मानवांत आणि फळाफुलांनी डवरलेल्या सृष्टीत, जिथे पाहावं, तिथे निसर्गानं गणित कोरलं आहे. निसर्गाचं गणित शुष्क नाही, नीरस नाही, रटाळ नाही आणि क्लिष्ट तर नाहीच नाही. निसर्गाचं गणित सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं आहे. निसर्गाच्या गणितात एक दिमाख आहे, सौष्ठव आहे. एका साध्या संख्याशृंखलेतून त्याचं प्रत्यंतर येतं. त्या शृंखलेच्या गुणधर्मात आपलं मन हरवून जातं. असं काही असू शकेल, याचं आपल्याला आश्र्चर्य वाटतं, फुलांच्या पाकळ्यांत, वनस्पतींच्या पानांत, सुंदर सुंदर कलाकृतींत आणि मानवाच्या आकारांत, भूमितीच्या आकृत्यांत आणि साध्या साध्या खेळांत, ही संख्याशृंखला प्रकटते, सा-या सा-या निसर्गात. अशा या अद्भुत शृंखलेचे विविध आविष्कार हाच निसर्गाचे गणित या पुस्तकाचा विषय आहे. '
विज्ञानNisargache Ganit | निसर्गाचे गणित
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Sale! Add to cartआकाश संपते, तिथे सुरू होते अथांग अंतराळ . या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार् या आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार् या या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -
All BooksOlakh Aplya Vishvachiee | ओळख आपल्या विश्वाची
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartपक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया आपल्या अवतीभवती उडणारी, बागडणारी, चिवचिवणारी, झेपावणारी या दुनियेचा वेध घेण्यासाठी नवी नजर देणारी ओळख पक्षिशास्त्राची
विज्ञानOlakha Pakshishatrachi | ओळख पक्षिशास्त्राची
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cart'गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती, वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ, गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र. पण यातल्या कितीतरी गोष्टी शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी आणि त्याही आपल्या भारतात ! आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव आणि कुट्टक अशा कितीतरी महान गणितज्ञांची भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित. हे गणित आणि त्यातले सिध्दांत संस्कृत भाषेतच का अडकून पडले ? त्याचे आजच्या संगणकयुगाशी काही नाते आहे का ? या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखविणारा मौल्यवान ग्रंथ.
विज्ञानPrachin Bharatiy Ganit (Part 1) | प्राचीन भारतीय गणित (भाग-१)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती, वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ, गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र. पण यातल्या कितीतरी गोष्टी शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी आणि त्याही आपल्या भारतात ! आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव आणि कुट्टक अशा कितीतरी महान गणितज्ञांची भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित. हे गणित आणि त्यातले सिध्दांत संस्कृत भाषेतच का अडकून पडले ? त्याचे आजच्या संगणकयुगाशी काही नाते आहे का ? या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखविणारा मौल्यवान ग्रंथ.
विज्ञानPrachin Bharatiy Ganit (Part 2) | प्राचीन भारतीय गणित (भाग-२)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'सर्वव्यापी आणि सर्वपरिचित अशा प्रकाशामागे कल्पना करता येणार नाही एवढे सखोल आणि विस्तृत विज्ञान दडलेले आहे. भौतिकशास्त्रातील अनेक क्रांतिकारक सिध्दांतांची गुरुकिल्ली प्रकाशाच्या अभ्यासातून सापडली. घरातील वीज, हातातील मोबाईल, दूरचित्रवाणीवरील प्रतिमा या सा-यांच्या स्वरूपात हे प्रकाशविज्ञान आता तर आपल्या रोजच्या आयुष्याला वेढून राहिले आहे. प्रकाशाशी निगडित विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा व्यापक पट उलगडून ठेवणारा सुबोध शैलीतील हा प्रकाशवेध वाचकांना नक्कीच उद्बोधक वाटेल. डॉ.आतिश दाभोलकर डिरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सायंटिफीक रिसर्च, पॅरीस आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक प्रकाशाने निरनिराळया संस्कृतींच्या आणि समाजांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. अतिशय प्रभावीपणे पांढरा प्रकाश देणा-या एलईडीसारख्या अनेक नव्या शोधांमुळे यापुढेही प्रकाशाच्या साहाय्याने शाश्वत विकास साधता येईल. यामुळेच एकविसाव्या शतकात प्रकाशाबद्दल जाणून घेणे प्रत्येकाला अतिशय आवश्यक आहे. डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांचे हे पुस्तक वाचकांना प्रकाशविज्ञान आणि प्रकाशतंत्रज्ञानाची समर्थपणे ओळख करून देणारे ठरेल, यात शंकाच नाही. डॉ.सिडने परकोविट्झ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक आणि विज्ञान साहित्यिक
विज्ञानPrakashvedh | प्रकाशवेध
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content