All Books
-
Sale! Add to cartधनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले. बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला. साहेब, काय करताय ? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का थांबवली तुम्ही ? तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ?'' एकावर एक प्रश्न... पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली माणूस इंग्लिशमधले कागद कसे वाचणार ? साहेब हे काय करताहेत ? जगदाळेंना कळतच नव्हते. बुरखाधा-याने कागदांवर नजर टाकली अन् धनेशच्या पायांवर लोळण घेतली. नेमका आहे तरी काय हा सगळा प्रकार ? धनेशने कोणते पेपर्स त्याला दाखवले ? काय होते त्यात ? कोणत्या रहस्याचा खुलासा करणार होती ती कागदपत्रे ? धनेश अखेरीस करणारच का बुरखाधा-याचा एन्काउन्टर ? का ? काय आहे काय हे ?
All BooksThe Secret Mission | द सीक्रेट मिशन
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cartMother Nature satisfies all her childrens' needs. She teaches us to live and let others live. Those who don't follow her rules, learn a tough lesson. The World of Flowers also learnt a lesson. How ? Read inside... The Story of Foreign Flowers
All BooksThe Story Of Foreign Flowers | The Story of Foreign Flowers
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमराठी साहित्यातील कविता आणि कथा या क्षेत्रांत नीरजा यांनी स्वत:चे एक स्थान तयार केले आहे. थिजलेल्या काळाचे अवशेष' ही त्यांची पहिलीच कादंबरी, या क्षेत्रातही त्या आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास देऊन जाते. स्वातंत्र्यानंतर भारत या देशातील समाज घडवतानानिरनिराळ्या क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींची विवक्षित भूमिका होती. ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयीला महत्त्व देणारी, विविधतेचे महत्त्व जाणून तिचा आदर करणारी आणि मानवतावादी चेहरा असणारी होती. गेल्या दशकात ही भूमिकाच बदललेली दिसते. आता ती निरनिराळ्या अस्मितांमध्ये विद्वेष निर्माण करणारी, बहुमतशाहीवादी, धर्म आणि राजकारण यांचे संयुग करू पाहणारी आणि अतिरेकी राष्ट्रवादी झाली आहे, असे जाणवते. या बदलामागची कारणे अत्यंत गुंतागुंतीची आहेत आणि मुख्य म्हणजे हा बदल लोकशाहीच्या मार्गानेच झालेला आहे. आधीच्या काळात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या तत्त्वांचा पाठपुरावा करतील अशा अनेक संस्था काढल्या होत्या. त्यातील एक होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - जेएनयू. १९८०च्या दशकात तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. त्यातील नजमा ही व्यक्तिरेखा तीन दशकांनंतर त्या गटातील जगभर विखुरलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना स्वतंत्रपणे आणि शेवटी एकत्रितपणे भेटते. या भेटीत प्रत्यक्षात विशेष काहीच होत नाही. पण त्यातून नीरजा गेल्या तीन दशकांत झालेले बदल आणि त्यामागची व्यामिश्र कारणे यांची चर्चा ताकदीने मांडतात, आणि त्या अनुषंगाने घडलेली पात्रे आणि आजच्या काळातले त्यांचे जगणे आपल्यासमोर जिवंत करतात. मराठीत चर्चा-नाटकांची परंपरा आहे; निदान माझ्या माहितीत चर्चा-कादंबऱ्यांची. त्या मानाने कमी आहे. ही कादंबरी साहित्याच्या या दालनात मोठीच भर घालते. ही कादंबरी, ठोस भूमिका असूनही, अभिनिवेश टाळत, सर्वांप्रती काही किमान सहानुभूती आणि आदर बाळगत, गेल्या काही दशकांतील बदललेल्या वास्तवाबाबत व्यापक परिस्थितीभान देते, हे या कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे. मकरंद साठे
All BooksThijalelya Kalache Avshesh | थिजलेल्या काळाचे अवशेष
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Read more -
Sale! Add to cartटीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणा-यांना ती दूषणं देत नाही. प्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका-खिंड लढवणा-या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९० घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे. मुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. सोनाली कुलकर्णी
All BooksTv Malika Ani Barach Kahi…! | टीव्ही मालिका आणि बरंच काही
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअंधत्वाची प्रमुख कारणं समजली. अनेकदा अंधत्वापासून व्यक्तीला वाचवता येत नाही, ही असहायता जाणवली. समाजात जागृती झाली तर अंधत्वाचा वारसा देण्याच्या चुकीपासून समाजाला सावरता येईल, हेही उमगलं. अंधश्रद्धा आणि अंधविश्वास यांपासून अंध व्यक्तींना मुक्त करून त्यांना मानवाधिकार मिळवून द्यायचा निश्चय केला. या ‘निवांत’च्या व माझ्या धर्माच्या लेकी आहेत. आईचं मुलांच्या हक्कांसाठी लढण्याचं बळ अपार असतं - मी त्याला अपवाद नाही. या काही प्रातिनिधिक कथा आहेत. या कथा वाचून आपण एखाद्या अंध लेकराला शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलात, तर तेच या पुस्तकाचं खर्याा अर्थानं यश असेल. आपली मीरा आई
All BooksTya Vishesh Drushtichya | त्या विशेष दृष्टीच्या
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Read more -
Sale! Add to cartमराठी कवितेच्या प्रवासातील सुमारे पाच दशकांहून अधिक काळ व्यापून असलेले, मराठी कवितेला वेगळे वळण आणि परिणामकारक बळ देणारे म्हणून समजले गेलेले कवी म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी ! सळाळ आणि सळाळनंतर... , समांतर , मथितार्थ व इत्यादि या कवितासंग्रहांनंतरचा त्यांचा हा पाचवा कवितासंग्रह. गेल्या अर्धशतकातील वेगाने बदलत्या जीवनाच्या सार् याच पातळ्या, आयाम, बाजू, संबंध, गुंतागुंत समग्रपणे कवेत घेणार् या, मोठ्या समाजमनाचे प्रतिंबिंब अन् मोठ्या कालखंडाचा कॅनव्हास घेऊन काव्यकृती साकारणार् या या कवीचा काव्यप्रवास शैली, आशय व चिंतनदृष्ट्या आपल्या वेगळेपणाने नजरेत भरतो आहे.
All BooksTyanantar … | त्यानंतर…
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartगाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर् यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर् यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ? गावात कोणकोणते पाहुणे आले ? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
All BooksUdnaryancha Talav | उडणार्यांचा तलाव
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartउद्योग यशोगाथा' या पुस्तकाबद्दल डॉ. अनंत सरदेशमुख यांचे हार्दिक अभिनंदन. औद्योगिक क्षेत्रातील व्यापक अनुभव, उद्योजकांसोबतचे दीर्घकाळाचे संबंध, औद्योगिक क्षेत्राचा प्रदीर्घ अभ्यास यातूनच डॉ. सरदेशमुखांना व्यावसायिक यशाचे मर्म जाणून घेता आले. अनुभव, अभ्यास व निरीक्षणातून ते एक परिणामकारक दृष्टिकोन प्रस्तुत करू शकले. विविध औद्योगिक क्षेत्रातील आठ यशकथांचे बनलेले हे पुस्तक केवळ उद्योजकीय उत्कृष्टतेचा गौरवच नव्हे, तर उद्योजकतेची आकांक्षा बाळगणार् या भावी व्यावसायिक नेत्यांसाठी प्रेरकही आहे. भारताच्या गतिमान, देदीप्यमान स्टार्टअप परिसंस्थेच्या आणि वेगाने विकसित होणार् या उद्योग-अर्थव्यवस्थेच्या संदर्भात उद्योग यशोगाथा' पुस्तकाने योग्य वेळ साधली आहे. त्याचा प्रभाव उभरत्या उद्योजकांवर नक्कीच पडेल. शाश्वत प्रगतीला पायाभूत प्रेरणा, पुढाकार, चिकाटी, नवनिर्मिती या मूल्यांचा समावेश या उद्योग यशोगाथेत आलेला आहे. अवश्य वाचनीय पुस्तक. संजय किर्लोस्कर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, किर्लोस्कर ब्रदर्स लि. अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ ॅग्रिकल्चर
All BooksUdyog Yashogatha | उद्योग यशोगाथा
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartसाहित्यापासून संगीतापर्यंत, छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत, इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे उत्तुंग भाग १ व २
All BooksUttunga : Part 1 | उत्तुंग भाग १
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार
All BooksUttunga : Part 2 | उत्तुंग भाग २
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content