-
Sale! Add to cart'भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव. स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता, संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस असं सारं लाभलेलं हे त्याचं स्व-गीत आहे. या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे, तसंच मराठमोळं साधेपणही आहे. रानारानात गेली बाई शीळ, माझिया माहेरा जा, गगनी उगवला सायंतारा, शुक्रतारा मंदवारा, आज अचानक गाठ पडे, शब्दावाचून कळले सारे, गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, तरूण आहे रात्र अजुनी, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, विसरशील खास मला... मराठी माणसासाठी जणू त्याच्या भावजीवनाच्या प्रत्येक क्षणाकरिता एकेक भावगीत उमललेलं आहे... शब्दसुरांच्या अदभुत प्रवासाचा हा भावनिक, सांस्कृतिक आठव...
संगीतSakhi Bhavgeet Maze | सखी भावगीत माझे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर् या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या वरवर चकव्यासारख्या वाटणार् या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार् या या पाच कादंबर् या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !'
कादंबरीSamagra Jayant Naralikar | समग्र जयंत नारळीकर
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Read more -
Sale! Add to cartविसाव्या शतकामध्ये भारतात कर्करोगाविषयक संशोधनाचा पाया घालणार् या संशोधिका म्हणून कमल रणदिवे यांची विज्ञानविश्वात ओळख आहे. त्या हाडाच्या वैज्ञानिक तर होत्याच पण विज्ञानप्रसारासाठी समाजातल्या सगळ्यांना सामावून घेणारी दृष्टीही त्यांच्याकडे होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणार् या या वैज्ञानिकेचे चरित्र नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक जाणीव जपणार् या संशोधिका - कमल रणदिवे
All BooksSamajik Janiva Japnarya Sanshodhika-Kamal Randive | सामाजिक जाणीव जपणाऱ्या संशोधिका – कमल रणदिवे
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartअमूर्त रेषा भिन्न काही असमांतर विश्वास आहे मूर्त-अमूर्त तो सापेक्ष अस्तित्वही समांतर आहे
कवितासंग्रहSamantar | समांतर
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Sale! Add to cartकोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते. साठोत्तर प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने पल्याड (एकोणीस-विसाव्या शतकातील युरोप, अमेरिका व रशिया) अन् अल्याड (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक- समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.
All BooksSamantar Rangabhumi : Palyad-Alyad | समांतर रंगभूमी
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartकाळाचे निदान करणे अवघड असते. समाजचिंतक आणि सर्जनशील लेखक ते करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. काळाचा तळठाव धुंडाळून मानवी जगण्याच्या अंगोपांगांना वेढून राहणार् या काळसंदर्भांचा उलगडा करण्याचा, आपल्या काळाला समजून घेण्याचा हा एक भाग असतो. गेल्या दशक-दोन दशकांपासून ही प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंताची आणि अतर्क्य होत चालली आहे. कारण माणूसपणाच्या विकसनशीलतेला आकार देण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या आणि गेल्या शतकापासून गतिमान झालेल्या आधुनिकीकरण - अत्याधुनिकीकरण या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार् या अनेकानेक बाबींची विपरीतता समकाळाच्या संभ्रमित रूपाला आकार देणारी ठरली आहे. त्यातील एका दुखर् या वेदनेचा माग काढण्याच्या भूमिकेतून पी. विठ्ठल यांची ही कादंबरी आपल्यासमोर येते. डॉ. आशुतोष पाटील आपल्या जगण्याचा एक भाग असलेला गुंता उकलून त्याच्या दाहक विरूपाचे दर्शन प्रत्ययकारीपणे घडवणारी कादंबरी.
All BooksSambhramachee Goshta | संभ्रमाची गोष्ट
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cart'ज्ञानपीठ-पुरस्कारप्राप्त डॉ.भालचंद्र नेमाडे यांचा केवळ कादंबरीकारच नव्हे तर देशीयतेचा सिद्धांत मांडणारे समीक्षक या नात्याने मराठी वाङ्मयजगतात एक दबदबा आहे. मराठी लेखकांच्या साठोत्तरी पिढ्यांतील अनेक लेखकांचे ते एक श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर कितीही प्रतिकूल टीका झाली, तरी अनेक लेखकांची त्यांच्यावरची श्रद्धा अढळ राहते. साठोत्तरी मराठी वाङ्मयक्षेत्रावर असा अभूतपूर्व प्रभाव पाडणारे ते एकमेव लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या वा लिहिल्या जाणाऱ्या अनुकूल वा प्रतिकूल लेखनाला आपोआपच भावनिक रंग चढलेले दिसून येतात. डॉ. सुधीर रसाळ यांनी डॉ. भालचंद्र नेमाड्यांच्या वाङ्मयविषयक भूमिकेची तटस्थ, अवैयक्तिक आणि वस्तुनिष्ठ चिकित्सा या ग्रंथात केली आहे. मराठी वाङ्मयात समीक्षक नेमाड्यांच्या समीक्षालेखनाचे मूल्य काय आणि एक समीक्षक या नात्याने मराठी समीक्षेत डॉ.नेमाड्यांचे स्थान काय, याची शास्त्रशुद्ध, तर्कबद्ध मीमांसा अन् मूल्यमापनात्मक समीक्षा म्हणजे समीक्षक भालचंद्र नेमाडे
रसग्रहण / समीक्षाSamikshak Bhalchandra Nemade | समीक्षक भालचंद्र नेमाडे
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartकेवळ स्त्रियांच्या कथनात्मक साहित्यातच नव्हे, तर समग्र मराठी साहित्यपरंपरेमध्ये ज्यांचे स्थान लक्षणीय ठरते, अशा लेखकांमध्ये सानिया यांचा समावेश होतो. त्यांचे लेखन संख्यात्मक दृष्टीने मोजके असले, तरी ते निश्चितपणे गुणवान व कसदार आहे. आपल्याला भिडलेला, भावलेला अनुभव त्याच्या सूक्ष्म कडा-कंगो-यांसह प्रतीकात्मक भाषेत सानिया आपल्या कथांमधून साकार करतात. बाह्यविश्वातील घटना-घडामोडींपेक्षा माणसांच्या अंतर्मनातील हेलकावे-हालचाली शब्दांकित करणा-या या कथांना एकाच वेळेस समकालीन व सार्वत्रिक परिमाण प्राप्त होते. त्यामुळे आपली निजखूण शोधण्याच्या प्रवासात सानिया यांच्या निवडक कथांचे हे संपादन वाचकाला मोठेच साहाय्य करील, यात शंका नाही.
कथासंग्रहSampadit Saniya | संपादित सानिया
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartचाकोरीबाहेरच्या असंख्य अभ्यासक्रमांची, ते शिकवणा-या संस्थांची, प्रवेशपात्रतेची, परीक्षापध्दतीची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत ? या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते ? त्या संदर्भातील सोयीसुविधा कोणत्या ? यासारख्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Samruddhichya Dishene Career | समृध्दीच्या दिशेने करियर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'कविता महाजन यांच्या या दीर्घकवितेत एका मासळीचे समुद्रातले जीवन चित्रित करण्यात आले आहे. या कवितेत सलगपणे रेखाटले गेलेले मत्स्यजीवनाचे चित्र हे अंतिमत: मानवी जीवनाचेच चित्र बनून जाते. मानवी जीवनासंबंधीच्या सनातन आणि मूलभूत जाणिवांचा व्यापक पट या दीर्घकवितेने आपल्या कवेत घेतला असून तो मत्स्यजीवनाच्या संदर्भात अर्थपूर्ण बनवला आहे. माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे असलेली जिजीविषा आणि तिच्याशी अतूटपणे संलग्न असलेली गूढ अशी मृत्युप्रेरणा यांचे प्रभावी व प्रत्ययकारी चित्र या कवितेत रेखाटले गेले आहे. मानव ज्या जगात जगत असतो त्या जगापेक्षा वेगळया जगाची त्याला वाटणारी ओढ, मुळात व्यामिश्र असलेल्या आणि त्यामुळे अल्प प्रमाणात आकलनीय असलेल्या या जगासंबंधीचे आणि या जगापलीकडचे जे अज्ञात आहे ते जाणून घेण्याची मानवाच्या ठिकाणी असलेली ऊर्मी, इच्छाआकांक्षांच्या तृप्तीची मानवाची धडपड आणि त्यात त्याला प्राप्त होणारे विपरीत फल, सभोवतालाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही तो साधला जाण्यातील अशक्यता, अशा या प्रतिकूल परिस्थितीमुळे जाणवणारी जीवनाची निरर्थकता, आशयशून्यता आणि त्यातून निर्माण होणारी परकेपणाची-एकाकीपणाची भावना, त्यामुळे बलिष्ठ होत जाणारी मृत्युप्रेरणा, अशा मूलगामी, सनातन जाणिवांचा प्रत्यय या दीर्घ कवितेत घडवला गेला आहे. मराठी काव्यपरंपरेत दीर्घकवितांची निर्मिती अल्प प्रमाणात झालेली आहे आणि आजही मराठी कवींना हा आव्हानात्मक काव्यप्रकार आकर्षित करून घेताना दिसत नाही. अशा परिस्थितीत कविता महाजनांची समुद्रच आहे एक विशाल जाळं ही एकाच वेळी कथात्म आणि चिंतनात्म रूप धारण करणारी दीर्घकविता मराठी काव्यपरंपरेतील ही उणीव काही प्रमाणात दूर करणारी ठरणार आहे.
कवितासंग्रहSamudrach Aahe Ek Vishal Jala | समुद्रच आहे एक विशाल जाळं
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more
">
Skip to content