-
Sale! Add to cartगुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून भारताचे पंतप्रधान या नात्याने सात वर्षांची कारकीर्द पूर्ण करीपर्यंत नरेंद्र मोदी यांनी जी मजल मारली, तिचा विविध क्षेत्रांमधील मान्यवर साक्षीदारांनी घेतलेला आढावा... प्रथम तेरा वर्षे राज्यात आणि नंतर केंद्रीय स्तरावर सात वर्षांत त्यांनी घडवलेल्या परिवर्तनाचा विस्तृत परिचय... अशक्य वाटणार् या अनेक गोष्टी शक्य करून दाखवणार् या एका किमयागार नेत्याच्या विलक्षण यशाचे रहस्य उलगडून दाखवणारा प्रभावी लेखसंग्रह. प्रस्तावना भारतरत्न लता मंगेशकर सहभागी लेखक पी. व्ही. सिंधू शोभना कामिनेनी सुरजित एस. भल्ला अमीश त्रिपाठी अमित शाह प्रदीप गुप्ता अनंत नागेश्वरन अरविंद पणगडिया डॉ. शमिका रवी उदय एस. कोटक अजय माथुर अनुपम खेर अशोक गुलाटी डॉ. देवी शेट्टी नंदन नीलेकणी नृपेन्द्र मिश्रा सद्गुरू सुधा मूर्ती अजित डोभाल (कीर्तिचक्रविजेते) मनोज लडवा, भरत बरई डॉ. एस. जयशंकर
All BooksModi@20 | मोदी@20
₹895.00Original price was: ₹895.00.₹671.00Current price is: ₹671.00. Save ₹224 Add to cart -
Sale! Add to cartमोगलाई' ही कादंबरी वाचली, आवडली. ही कादंबरी लेखकाच्या आधीच्या कादंबरीलेखनाचे - धरणसूक्त'चे पुढचे पाऊल आहे. या कादंबरीचे वेगळेपण असे की, येथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. शिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही या कादंबरीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मागास समजल्या जाणाऱ्या भागात सृजनाच्या सोहळ्यात गुंतलेल्या हातांनी अन् मनांच्या कसदार मशागतीनी नवी कार्यसंस्कृती उभारणाऱ्या अभियंत्याची गुंतवून ठेवणारी कहाणी...
All BooksMogalaee | मोगलाई
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं
मुलांसाठीMoru Aani Itar Katha | मोरू आणि इतर कथा
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cartडिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी.
तिचं रहस्य ‘दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा
इस्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू.
पण हे इस्रायलला कसं चालणार ?
मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं.
व्हॅनुनूला स्वत:च्या जाळ्यात ओढून ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी.
सिंडी एकाच वेळी ‘सीआयए' आणि ‘मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का?
युनायटेड स्टेट्स , फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका
या राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली?
अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का?
तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का?
सिंडीचं पुढे काय झालं?
या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी,
इस्रायलच्या ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणार्याे जागल्याची कहाणी...All BooksMosad Mohini | मोसाद मोहिनी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartजगात कुठेही मानवजात संकटात सापडली, की धावून जायचं, हा मदर तेरेसांचा सहज धर्म ; मग तो बांगलादेशचा महापूर असो, ग्वाटेमालातला भूकंप असो किंवा इथियोपियातला दुष्काळ असो. आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या सगळ्या जागी जाताना त्यांना आठवत असे, ती स्वत:ची जन्मभूमी अल्बानिया. आपल्या देशाच्या झालेल्या चिंध्या पाहून त्यांना क्लेश होत. त्या म्हणत, एक शेवटची इच्छा आहे, माझ्या जन्मभूमीत जाऊन कार्य करण्याची. तिथे माझी आज फार गरज आहे. कशी होती त्यांची जन्मभूमी ? त्यांचं बालपण ? त्यांच्या बालपणापासून ते मदर पर्यंतच्या प्रवासाची ही धावती ओळख.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMother Terresa | मदर तेरेसा
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreकविता हा एक सूक्ष्म जाणिवांच्या तीव्रतर अभिव्यक्तीचा प्रकार आहे. कविताच्या मुळाशी अस्वस्थ करणारी संवेदनशीलता असावी लागते. शिवाय आनंदोत्सवात बुडून जाणारी अनावर इंद्रियजन्यताही लागते. तिची उपड अनुभवातच असते. नेमकी, संक्षिप्त, सूचक, अमूर्त, अनेकार्थी भाषा कवितेला लक्षणीय रूप देते. कविता महाजन यांच्या मृगजळीचा मासा या संग्रहातील कविता अस्सल कवितेच्या सगळ्या प्राथमिक अटी पूर्ण करण्यात बव्हंशी यशस्वी होतात. त्यांचा भावनावेग प्रचंड वेगानं भाषेचा हिमखंड खेचून आणतो. आणि वाचकांना एकाचवेळी लाव्हारसाचा आंतरिक दाह न रक्त गोठवणारी हिमसर्दता अनुभवायला लावतो. त्यांची कविता स्त्रीवादाच्या सांकेतिक अभिव्यक्तीला उद्ध्वस्त करते आणि वाचकांना विचारशील बनवते. शिवाय कवितातल्या उत्स्फूर्त बोधनाच्या, अंतर्ज्ञानाच्या जागाही दाखवते. निव्वळ भावावेगात अडकून न पडता ती बुध्दीकडे प्रवास करते आणि वाचकांनाही या प्रवासाची सक्ती करते. यात सौंदर्याचा तोल ढळू न देण्याची काळजी घेते. विचार हरवत चाललेल्या आणि प्रतिक्रियांवरच आयुष्य घालवणा-या आपल्या सद्य:कालीन खुरटया समाजात या कविता विलक्षण झेप घेतात, वाचकांची जाण वाढवतात व वाचकाची आधिभौतिक भूक भागवण्याचाही प्रयत्न करतात. त्यांचा हा संग्रह प्रौढ, परिपक्व तर आहेच; समकालीन मराठी कवितेत त्यानं आपलं स्थानही अढळ केलं आहे.
कवितासंग्रहMrugajalicha Masa | मृगजळीचा मासा
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
Sale! Add to cartऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी, ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे, हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे.... ... आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृद्धश्रम, कौटुंबिक-कलह, संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक विषयांवरसुद्धा मैत्रिणीशा हितगुज करावे तसे वाचकांशी सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या रविवार सकाळ मधील मुग्ध मधुर या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक.
वैद्यकीयMugdha Madhur | मुग्ध मधुर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartरक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे म्हणायचे ! आहे खरी कथाभागाच्या केंद्रस्थानी. उसन्या नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट, वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या व्यापक सर्जनशीलतेकडे फिरविलेली पाठ आणि उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणा-या घराण्याच्या अंधा-या तळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर वावरणा-या व-हाडच्या पाश्र्वभूमीवरील या बहुपदरी व गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये ? तिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व स्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातून आलेल्या स्त्रियाच ना !
कादंबरीMukhavta (Lokaavrutti) | मुखवटा (लोकआवृत्ती)
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreदेशासाठी कशा-कशाची पर्वा न करता प्राणांची आहुती देणारे ज्ञात-अज्ञात सैनिक. त्यांचे अस्तित्त्व आपण गृहीत धरतो आणि त्यांच्या भरवशावर आपण विश्वासाने, आनंदाने जगतो. अशा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याची ही झलक. कमालीच्या प्रासादिक पद्धतीने लिहिलेली. सैनिक नावाच्या माणसाला ओळखायला मदत करणारी !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMukkam: Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
वैद्यकीय
Mulanche Aarogya Palkanchya Hati | मुलांचे आरोग्य पालकांच्या हाती
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart
">
Skip to content
