-
Sale! Add to cartमाणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणा-या एका अद्भुत यंत्राची चित्तथरारक कथा. वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची, यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची, सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही. असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही...
विज्ञानNabh Akramile | नभ आक्रमिले
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreतारा कसा जन्मतो ? कसा प्रकाशतो ? पृथ्वीवरच्या जीवनविकासाला कारणीभूत असणारा आपला सूर्य केव्हा जन्मला ? आणखी किती वर्षे तो असाच तेजाने तळपणार ? ता-यांचे तेज संपले की त्यांचे काय होते ? कसा असतो त्यांचा शेवट ? पल्सार म्हणजे काय ? कृष्णविवरात काय दडले आहे ? गूढ तारकाविश्वाचा वैज्ञानिक वेध घेणारे खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना सोप्या आणि रंजक पध्दतीने उकलून दाखवणारे नभात हसरे तारे '
विज्ञानNabhat Hasre Tare | नभात हसरे तारे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart(फाळणीनंतर) पाकिस्तानातील हिंदूंची स्थिती नाझी जर्मनीतील ज्यूंसारखी होईल. (भारत आणि पाकिस्तान या) दोन्ही देशांनी हे मान्य करावे की, आपल्या देशातील धार्मिक व सांस्कृतिक अल्पसंख्याकांना दुस-या देशात स्थलांतरित होण्याची इच्छा व्यक्त करण्याचा हक्क राहील... अशा स्थलांतराच्या विरुद्ध असणारे सर्व कायदे व नियम रद्द व शून्यवत होतील... ही योजना नेमकेपणाने व्याख्या केलेल्या अशा काही अल्पसंख्याकांपुरतीच मर्यादित केली पाहिजे की, जे धार्मिक किंवा सांस्कृतिक भिन्नत्वाच्या कारणांमुळे निश्चितपणे भेदभावाचे किंवा पक्षपाताचे बळी ठरणारे आहेत... पहिली पाच वर्षे ही योजना आयोगामार्फत सरकारी मदतीने व खर्चाने होईल... ह्या कालमर्यादेनंतर स्थलांतर करायचे असेल, तर त्यांना सरकारी मदतीशिवाय व स्वत:च्या खर्चाने कधीही स्थलांतर करण्याचे स्वातंत्र्य राहील.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या सहा शेजारी देशांमधील ठरावीक व्यक्तींना भारताचे नागरिकत्व ज्या कायद्याने मिळू शकते, त्या नव्या कायद्याच्या विविध पैलूंचा वेध घेणारे -
All BooksNagarikatva Durustee Kayada | नागरिकत्व दुरुस्ती कायदा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartप्राणी, पक्षी, झाडे, नद्या, डोंगर असा नैसर्गिक भवताल आणि माणसाने तयार केलेल्या काही गोष्टी या सगळ्यांमधून गोल, चौरस, त्रिकोण, आयत, अंडाकृती असे अनेक आकार आपल्याला दिसतात. शिवाय नीट पाहिले तर उभ्या, आडव्या, तिरप्या आणि नागमोडी रेषाही कितीतरी ठिकाणी असतात. हे सगळे आकार आणि रेषा या पुस्तकात कुठे कुठे दिसतात, शोधा पाहू.
All BooksNagobacha Vetola | नागोबाचं वेटोळं
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cart'आमच्या वाडवडलांच्या हाती पाटी-पुस्तक आले नाही, परंतु त्यांच्याकडे जन्मजात शहाणीव होती. गरिबी होती, लाचारी नव्हती. दैन्य होते, दारिद्र्य नव्हते. संघर्ष होते, वैर नव्हते. अंधश्रद्धा होती, अमानुषता नव्हती. जीवनाने कधी क्रूर थट्टा केली, तरी त्यांनी प्राणपणाने श्रद्धेच्या वातीचे रक्षण केले आणि श्रद्धेने त्यांना तारले. श्रद्धेसाठी ते भावरत असा शब्दप्रयोग करीत. पिढ्यान् पिढ्यांचा भावरताचा वारसा जपणारे स्फटिकासारखे स्वच्छ, पाण्यासारखे प्रवाही, निसर्गासारखे निर्मळ आत्मकथन. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNahi Mi Ekala | नाही मी एकला
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart -
Sale! Add to cartमीरा: मि. नेने, मुलांच्या एकेका वयाचा खास असा गुणधर्म असतो. लहानपणी आपल्या पालकांइतके शक्तिवान पालक जगात कोणाचेच नसतील, असंच मुलांना वाटत असतं. ते वयच तसं असतं. पण आणखीही एक वय असतं. कोणत्याही पूर्वसूरींची पुण्याई न मानण्याचं वय. या वयात, आपल्या पालकांइतके वेडे पालक जगात कोणालाही लाभले नसतील, असंच मुलांना वाटतं. बहुतांशी वेळा या प्रतिक्रिया टोकाच्या असल्या, तरी क्वचित प्रसंगी त्या सत्यही असू शकतात.
नाटक / नाट्यविषयकNakalat Sare Ghadale | नकळत सारे घडले
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartकॅमे-याचा शोध लागला, म्हणून चित्रकलेचा आनंद लोपला नाही. गुगल अर्थवरून गिरी-पर्वत दिसले, म्हणून गिर्यारोहणातला थरार संपला नाही.. तसंच अनेक शोधांनी, अद्ययावत साधनांनी, तंत्रज्ञानानं माहितीचा खजिना सापडला; तरी काळोख्या रात्री वेळापत्रकं आणि नकाशे वापरून आकाशनिरीक्षण करण्याचा आनंदही कमी झालेला नाही. मानवी मनात जिज्ञासा आणि सौंदर्याची आस आहे, तोपर्यंत आकाशनिरीक्षणाची भुरळ कायम राहणार आहे. आकाशनिरीक्षणाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वाचायलाच हवं असं – नक्षत्रविहार
विज्ञानNakshatravihar | नक्षत्रविहार
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartस्थलांतर करू पाहणार् या पक्ष्यांच्या एका थव्याला, प्रवासामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका टप्प्यावर प्रत्यक्ष नेत्याचे नीतिधैर्य संपते. नेताहीन थवा दिशाहीन होऊन इतस्तत: विखुरतो. या प्रवासात शिकून शहाणा होत असलेला एक लहान पक्षी सर्वांना धीर देतो. अखेरच्या संकटापार जाण्याची उमेद त्यांना देतो. नंदनवन संगीत-नृत्य-नाट्य
All BooksNandanvan | नंदनवन
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. रघुनाथ माशेलकर (FRS) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत पुस्तक वाचताना आपण सहप्रवासी कधी होतो ते समजतच नाही, ही त्यातली खरी गंमत आहे. त्या दोन मित्रांच्या गप्पांत आपण रंगून जातो, जणू तो काळ जगू लागतो, त्यायोगे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण आपण नकळत सुज्ञतेचे धडेही आत्मसात करतो.... कृष्णाच्या दैवी रूपापल्याड नेणारी ही शिकवण आहे... प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे, हे मी आवर्जून सांगेन. डॉ. सुचेता परांजपे संस्कृत, वेदिक स्टडीज' आणि इंडॉलॉजी'; मध्ये जगभर मान्यताप्राप्त विदुषी; अमेरिकन, जर्मन विद्यापीठात प्राध्यापिका (BORI) महाभारत चिकित्सक आवृत्ती';च्या समितीवर; फग्र्युसन कॉलेज फेलो दोन निरनिराळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन प्राचीन इतिहासाला आजच्या संदर्भात आणून एक अतिशय वाचनीय आणि उत्सुकता वाढवणारं वाङ्मय लिहायचं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. खूप अवघड मार्ग आहे हा. कुठेही, अगदी काळाबद्दलही चूक नाही; सगळं कसं एकसंध. आपल्या प्राचीन परंपरा आणि वाङ्मय यांना कारण नसताना धुत्कारणा-या नवीन पिढीचे डोळे उघडणारं हे मनोरंजक पुस्तक सर्वांनीच वाचावं असं आहे. डॉ. मोहन आगाशे मानसोपचारतज्ञ, कलाकार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते अगदी सामान्य परिस्थितीमधील गंमत शोधण्याची हातोटी लेखकांपाशी आहे आणि ही विनोदबुद्धी मला आनंददायी वाटली... पुस्तकाची भाषा सहज आहे. अनेक बोधकथा आणि दंतकथा सांगताना वापरलेली दोन पात्रांमधील संवादात्मक शैली मनोवेधक असल्यामुळे पुस्तक हातांतून सोडवत नाही... अनुभवानुसार हे पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा दीर्घकाळ माझ्या स्मरणात राहील.
All BooksNandighosh-Yatra – Shrikrishnakatha : Vedh Nava | नंदीघोष – यात्रा
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart'अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी नॅनोतंत्रज्ञानावर मराठीत पुस्तक लिहिलं आहे, हे कळल्यावर मला फार आनंद झाला. भारतीय भाषांमध्ये अशी पुस्तकं निघाली, तर नॅनोतंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी त्यांचा अतिशय फायदा होईल. प्रो.सी.एन. आर. राव नॅशनल रिसर्च प्रोफेसर, लायनस पॉलींग रिसर्च प्रोफेसर नॅनोटेक्नॉलॉजी हे जीवन पूर्णपणे बदलून टाकणारं तंत्रज्ञान आहे. या खिळवून ठेवणा-या पुस्तकात नॅनोटेक्नॉलॉजीचे जादुई परिणाम अतिशय ओघवत्या आणि सोप्या भाषेत सांगितलेले असूनही त्यातली अचूकता वाखाणण्याजोगी आहे. हे पुस्तक वाचून मी स्वत: अनेक गोष्टी शिकलो. डॉ.रघुनाथ माशेलकर सीएस्आयआर भटनागर फेलो प्रेसिडेंट, ग्लोबल रिसर्च अलायन्स, एनसीएल, पुणे एकविसाव्या शतकात नॅनोसायन्स हे वेगाने पुढे येणारे तंत्र आहे. हा कठीण विषय, सोपी सोपी परंतु लिखाणास साजेशी अशी खूप उदाहरणे देऊन या दोघांनी तो समजावयास सोपा केला आहे. भविष्याचा वेध घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. डॉ.अरुण निगवेकर माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग; माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ; संस्थापकीय अध्यक्ष, नॅक नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर वेगवेगळया प्रकारांनी पडणार असल्यामुळे या तंत्रज्ञानाची माहिती समाजातल्या सगळया घटकांनाच होणं गरजेचं आहे. श्री.अच्युत गोडबोले आणि डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेलं हे पुस्तक ही गरज योग्य रीतीनं भागवतं. डॉ.सतीशचंद्र ओगले रामानुजम फेलो सीनियर सायंटिस्ट, एनसीएल, पुणे नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान हा विषय रंजकपणे सांगण्याचे आव्हान अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी अत्यंत समर्थपणे झेलले आहे. शास्त्रीय गाभ्याला धक्का न लावता सर्वांना समजेल अशा भाषेत या तंत्रज्ञानाच्या मागील मूळ तत्त्वे त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. डॉ. दिलीप कान्हेरे प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ '
विज्ञानNanoday | नॅनोदय
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content