इतिहास
-
Sale! Add to cartमहाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे संकुचितपणाला थारा न देणारे राज्य... व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळे पुरोगामी प्रतिमा मिरवणारे. या नावामागे उभी आहे एक जिवंत संकल्पना. इतिहासकाळापासून अस्तित्वात असणारी आणि तरीही वेळोवेळी बदलत जाणारी... विविध साधुसंतांनी आणि विचारवंतांनी आपापल्या परीने सजवलेली, रुजवलेली... महाराष्ट्रधर्म ही तिची उपशाखादेखील वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडली गेलेली. स्वतंत्र भारतात भाषा हा आधार मानून राज्यांची पुनर्रचना झाली, तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना बळावली. त्या असंतोषातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. त्या चळवळीला बहुतांशी यश मिळाले आणि आजचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्या घटनेला तब्बल ५० वर्षे उलटून गेल्यानंतर कोणते चित्र दिसते आहे आणि काय दिसायला हवे, या दोन प्रश्नांच्या अनुरोधाने चिकित्सक पण विधायक दृष्टीकोनातून केलेली ही साधार चर्चा. विचारांना प्रवृत्त करणारी आणि दिशा दाखवणारीही...
इतिहासMaharashtra Eka Sankalpanecha Magova | महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Out of stock
Read moreमहाराष्ट्र देशाने प्राचीन काळापासून आपले स्वत्व जपले, प्रादेशिकतेचा अतिरेक न करता राष्ट्रधर्म वाढवला. संपूर्ण हिंदुस्तान यवनांच्या तावडीत सापडलेला असताना महाराष्ट्राने मराठी धर्म, संस्कृती टिकवण्याचा यशस्वी प्रयोग केला. मराठी समाजाने देशाला अनेक लोकविलक्षण व्यक्ती आणि संस्थांचे योगदान केले. ब्रिटिश राजवटीत राजकारण, समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात झपाट्याने अध:पतन चालू असताना महाराष्ट्राने स्वत:ला सावरले आणि परकीय राजवटीच्या बुद्धीभेदाला बळी न पडता आपले प्रबोधन व आधुनिकीकरण घडवून आणले. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, रोमहर्षक घडामोडी झाल्या. राष्ट्रवादा, सामाजिक सुधारणा, पाश्चात्य विचारसरणीतील उदारमतवाद, सशस्त्र क्रांती, राष्ट्रीय चळवळ - एक ना दोन शेकडो घडामोडी. अन त्यात गुंतलेल्या, त्यांच्या कर्त्या करवित्या कैक मराठी वा अमराठी व्यक्ती. एकोणिसाव्या शतकातील राजकारण, धर्म, संस्कृती, शिक्षण पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राच्या स्तिमित करणा-या कर्तृत्वाचा वेधक आलेख.
-
Sale! Add to cartएकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे अर्वाचीन महाराष्ट्राचे चैतन्यपर्व ! या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक रथी-महारथी अवतरले. प्रचंड वैचारिक रणधुमाळी माजली. अनेक प्रयोग झाले. त्यांपैकी काही यशस्वी झाले, काही अपयशी ठरले. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या चळवळी आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही आपल्या जीवनाला स्पर्श करीत आहेत. त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे काम सोपे करणारे हे पुस्तक.
इतिहासMaharashtra Gatha Part 2 | महाराष्ट्रगाथा (भाग २)
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी ? कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर ? कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक ? काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती ? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी सांगितलेली महाराष्ट्राची कुळकथा.
इतिहासMaharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कुळकथा
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartमाणसाचं निसर्गाशी एक अतूट, अलौकिक, अगम्य आणि अनादी नातं आहे. तरीही मनुष्य हा निसर्गप्रेमी प्राणी आहे, हे विधान मात्र आज अ-वास्तव' ठरलं आहे. संगणकीय संवादाच्या या युगात माणसाला निसर्गाशी संवाद साधायला वेळ नाही. आपल्या आलिशान अन् प्रशस्त घराच्या छताला त्याने चंद्रतारे लटकवले आहेत. आख्खं आभाळ आपल्या खिडकीच्या चौकटीत बंदिस्त केलंय अन् वृक्षांचं बोनसाय करून पर्वतावरील दूरची रम्यता' जवळ केलीय. कलावंताचं हृदय असणारा अत्यंत सामान्य माणूस मात्र एखाद्या टेकडीच्या टोकावर थिजलेलं, आकाशातून पडलेलं रक्तबीज बुब्बुळात साठवतो. सोनेरी कणांच्या गालिच्यावर अलगद पावलं टाकत निरव शांततेत क्षितिजासह स्वत:ला डुबवतो. तर कोणी दऱ्याखोऱ्यात, रानावनात भणंग भटकंती करतो मनमुराद! कोणी त्याला छंद म्हणतो, कोणी वेडेपणा! हाच वेडेपणा सामान्याला असामान्य बनवतो. त्याला स्वत:ची ओळख मिळते, स्वत:चा शोध लागतो. तो सामान्यांच्या समाजरंगात रंगूनही वेगळा राहतो. असाच वेडेपणा श्री. रमेश देसाई यांनी केलाय. जे दिसलं ते टिपलं, असं हे छायाचित्रण नव्हे. विषय-वस्तूशी तादात्म्य साधून जो विशिष्ट क्षण छायाचित्रकार टिपतो, त्या क्षणाच्या प्रतीक्षेसाठी त्याला खूप संयम आणि धीर धरावा लागतो. श्री. देसाई धबधब्याचं रासवट सौंदर्य अन् घनगंभीर स्वर आपल्या डोळ्यात, कानात, साठवतात; जमिनीकडे झेपावणाऱ्या प्रत्येक धबधब्याची अदाकारी अनुभवतात. धबधब्यात भिजण्याचा आनंद तेही घेतात. परंतु ते तिथे जातात ते त्या धबधब्याला भेटण्यासाठी. अनुभवतात ते कलात्मक झिंग, भव्य सौंदर्य आपल्या फ्रेममध्ये भरून ! महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा भौगौलिक विविधतेतील काही अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळं श्री. देसाई यांनी टिपली आहेत. हे छायाचित्रण करताना त्यांचं कवि-कलावंत मन निसर्गाच्या विद्रूपीकरणानं विदीर्ण झालंय, त्यांनी पावसाळी सहलप्रेमींना अनेक दालनं उघडी केली आहेत; त्यांचं आवाहनही सहलप्रेमींनी लक्षात ठेवायला हवंय. सुधीर शालिनी ब्रह्मे
All BooksMaharashtratil Dhabdhabe | महाराष्ट्रातील धबधबे
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Add to cart -
Sale! Add to cartरशियाच्या स्टॅलिनच्या जुलमी राजवटीचा काळ. कामधंद्यानिमित्त रशियात राहिलेल्या परदेशी नागरिकांवरही अनन्वित अत्याचारांची आवळमिठी. स्लाव्होमिर राविझ हा असाच 24 वर्षांचा निरपराध पोलिश लेफ्टनंट. १९३९ साली रशियन गुप्तहेरांनी त्याला हेरगिरीच्या आरोपावरून २५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याची रवानगी झाली उत्तर सैबेरियातल्या एका तुरुंग तळावर. मग त्यानं आपल्याचसारखे ६ सवंगडी जमवले आणि पलायन केलं. गोबीचं वाळवंट, तिबेट आणि हिमालय पार करीत ४ooo मैल अंतर काटून ते भारतात आले. सगळेजण नव्हे. पण वाचलेल्यांत स्लाव्होमिर होता. या निरपराध युद्धकैद्यांची सपशेल खोटी वाटावी अशी खरी पलायन-साहसकथा ! '
इतिहासMala Nisatlach Pahije | मला निसटलंच पाहिजे
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartबाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने 'लोकमान्य', तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने 'राजद्रोही' ! टिळकांना नामोहरम करण्यासाठी 'राजद्रोही' ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड ! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!
इतिहासMandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreदोनशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवसायाने अनेक वळणे पार केली, कित्येक चढउतार पाहिले. कितीतरी व्यक्ती आल्या आणि आपापल्या कर्तृत्वाचा कमी-अधिक ठसा उमटवून काळाच्या पडद्याआड गेल्या. त्या सर्व घटना-प्रसंगांचा, वैशिष्टयपूर्ण व्यक्तींचा आणि प्रयोगशील संस्थांचा परिश्रमपूर्वक संकलित केलेला साक्षेपी इतिहास.
इतिहासMarathi Granthprakashnachi 200 Varshe | मराठी ग्रंथ प्रकाशनाची २०० वर्षे
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Read more -
Sale! Add to cart१९५५ नंतरचा अफगाणिस्तान. संधिसाधू अफगाण्यांनी रशियाला आत घेतलं. रशियाला हुसकावण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसलीच. दोन महासत्तांचा जोरदार सामना अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरू झाला. यातून उदय झाला हिंस्र तालिबानींचा. या धुमश्चक्रीत होरपळली अफगाणिस्तानची जनता. अगदी दारुण ससेहोलपट झाली अफगाण स्त्रियांची. या बलाढ्य षड्यंत्राविरुद्ध उभी राहिली विशीतली तरुणी मीना ! तिनं या बलाढ्य सत्तांविरुद्ध जागृतीचं भूमीगत कार्य उभारलं. तिच्या भोवती जमल्या नवरा-बाप-भाऊ-मुलगा गमावलेल्या अनेक स्त्रिया. तिनं उभी केली संघटना. पण तिसाव्या वर्षी मीना चा दुर्दैवी अंत झाला. तिची ही चरित्रगाथा जिवाला चटका लावणारी !
इतिहासMeena : Afganmukticha Akrosh | मीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart१९६२. चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारुण पराभव झाला. तो पराभव विसरण्यातच आपण आजवर धन्यता मानली. त्या तंद्रीतून आपल्याला हलवून जागे करणारे हे पुस्तक आहे. बर्फाचे तट पेटून उठले होते, तेव्हा सुभेदार जोगिंदरसिंगांनी किंवा मेजर शैतानसिंगांनी हौतात्म्याचे पलिते पेटवले होते. त्यांच्या स्फूर्तिदायक कथा सांगणारे हे पुस्तक आहे. नेहरू-मेनन यांच्या भोळ्याभाबड्या, स्वप्नाळू राजकारणाला गाफील हेरयंत्रणेच्या अवास्तव अंदाजामुळे खतपाणी घातले गेले होते. त्या हिमालयीन घोडचुकीचा तपशील मांडणारे हे पुस्तक आहे. जुनाट शस्त्रास्त्रे, अपुरी रसद, राणा भीमदेवी व्यूहरचना यांच्याइतकाच कौल-थापर-पलित यांच्यासारख्या लष्करी अधिकार् यांमधील बेबनावही पराभवाला जबाबदार होता. हेंडरसन-ब्रूक्स समितीच्या अतिगोपनीय अहवालाचा हा निष्कर्ष प्रकाशझोतात आणणारे हे पुस्तक आहे.
इतिहासNa Sangnyajogi Goshta | न सांगण्याजोगी गोष्ट
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart
">
Skip to content