99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष #विश्वासपाटील यांना बऱ्याचदा मुलाखतीत प्रश्न विचारला जातो.. तुम्ही इतक्या कादंबऱ्या लिहिल्या पण तुमची आवडती कादंबरी कोणती..
उत्तर एकच असतं.. ‘लस्ट फॉर मुंबई’
परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे… म्हणजे ‘लस्ट फॉर #मुंबई’ कादंबरी..
मायानागरीत संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैया दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळ्या उखडल्या.
चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला !
तुमच्या-आमच्या डोळ्यांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…
म्हणजे ‘लस्ट फॉर #मुंबई’
#गिरणीकामगार
#VishwasPatil #MarathiLiterature #MarathiCulture
#JayMarathi #Babasaheb Ambedkar
#Literary Journey
#SahityaSammelan #MarathiAbhiman
#Cultural Heritage #ThoughtLeaders
#HistoryAndLiterature #MarathiManus
">
Skip to content