-
Sale! Add to cart'छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक, असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स, विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत ? लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच - लैंगिक निरक्षरता ! सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते. शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर, तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार ? आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात. यावर उपाय एकच - तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे ! का व कसे, हे समजावून सांगत आहे, सुलभ आणि सचित्र तारुण्यभान ...'
वैद्यकीयTarunyabhan | तारुण्यभान
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'सळसळतं तारुण्य हा प्रत्येकाच्या जीवनातला हवाहवासा टप्पा. उद्याची स्वप्नं पाहण्याचं, मैत्री-प्रेम-सहवासात डुंबण्याचं, मुक्त जगण्याचं हेच वय. या टप्प्यावर जीवनाला भावी दिशा देणारे रस्ते जसे भेटतात, तशीच आयुष्याचा कडेलोट करणारी धोक्याची वळणंसुद्धा ! या निसरडया टप्प्यावर तरुणाईनं आपला ताल आणि तोल कसा सांभाळावा, तारुण्याचे कल्लोळ कसे सावरावेत, याचं एका अनुभवी तज्ज्ञानं केलेलं मोलाचं मैत्रीपूर्ण मार्गदर्शन.
वैद्यकीयTarunyagan | तारुण्यगान
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartनिरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो तार् यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का? तारा तुटतो' म्हणजे नेमके काय घडते? दुसर् या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.
All BooksTaryanchi Jeevangatha | ताऱ्यांची जीवनगाथा
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartटाटा ... भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTatayan: Ek Poladi Udyamgatha | टाटायन : एक पोलादी उद्यमगाथा
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cart'तो एक आव्हानात्मक कालखंड होता... परस्परविरोधी तत्त्वप्रणाली अन् द्वंद्वांनी भरलेल्या प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य, आघाडी सरकार, आक्रमक विरोधी पक्ष या सगळ्यांनी विस्कळीत झालेला कालखंड... त्या काळात लोकसभेचे सभापती होते सोमनाथ चटर्जी. लोकसभा म्हणजे लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ. आणि सभापतीपद म्हणजे जणू या लोकसभेचा मानदंडच. हा मानदंड पेलताना सोमनाथ चटर्जींना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागले. सदसद्विवेकाच्या कसाला उतरावे लागले. पक्षांच्या कुंपणांना पार करून विवेकनिष्ठेला साक्षी ठेवून घटनेचे श्रेष्ठत्व जपावे लागले. त्यांच्या काळाचा अन् कर्तृत्वाचा आलेख म्हणजे तत्त्वनिष्ठेची जपणूक
इतिहासTatwanishthatechi Japnuk | तत्त्वनिष्ठेची जपणूक
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू... त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं... रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक, त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचा-यांनी सुरु केलेला मदतीचा ओघ... मृत्यूच्या सावटाखाली घालवलेल्या 'त्या' चौदा तासांचा जीवघेणा अनुभव सांगताहेत, 'ताज'चे कर्मचारी अंकुर चावला...
इतिहासTe Chauda Tas (Taj Halla Aatun Anubhavtana) | ते चौदा तास (ताज हल्ला ‘आतून अनुभवताना)
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'तें तुम्ही आम्हाला पटलात, आवडलात,स्पर्शून गेलात, ते वास्तवाला थेट भिडण्याच्या वृत्तीमुळे. या वृत्तीमागे होती एक अदम्य जिज्ञासा... जगण्याबद्दलचे नितांत कुतूहल. या कुतूहलापोटी तुम्ही माणसांना बोलते करायचात आणि ऐकायचात तेव्हा वाटायचे, तुम्ही समोरच्याचा अनुभव आणि त्या अनुभवाआतला काळ स्वतःत रिचवत आहात. तुमचा स्वतःचाही एक काळ होता. आतला आणि भोवतालचा. त्या दोन्हीतले नाते तपासत, त्यातली स्थित्यंतरे अनुभवत तुम्ही त्यांचा ताळेबंद मांडत राहिलात. म्हणूनच जेव्हा तुम्ही माझा काळ हाच विषय घेऊन दीर्घ लेखन करायचे ठरवले, तेव्हा तुमच्या पिढीचा सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय संक्रमणाच्या उलथापालथीचा काळ दस्तावेज म्हणून आमच्या हाती लागणार याची खात्री झाली. पण..तुम्ही जिला नियती म्हणता तिने मधेच तुम्हांला गाठले आणि तुमचा काळ थांबला. तरीही तुम्ही आपल्या आरंभकाळा विषयी जे लिहिले आहे त्यातून तुमचे आमच्या काळातले असणे किती मोलाचे होते याचा प्रत्यय तुमच्या नसण्या नंतर अधिकच प्रखरपणे येतो आहे... तुमचा, जयंत पवार
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTe Diwas | तें दिवस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'हे अनुभवकथन आपल्याच समाजातील अंधांचे एक विश्व उजेडात आणतं. या विश्वात सुखदु:ख, आशानिराशा यांचे स्वाभाविक हेलकावे आहेत, विविध कलागुणांचे जोरदार आविष्कारही आहेत. हे लेखन सहानुभूतीच्या भाराने वाकलेले नाही, तर आशावादानं जगण्याची प्रेरणा देणारं आहे. मुख्य म्हणजे एका सर्वसामान्य गृहिणीच्या मातृत्वाचा परीघ कसा सहजपणे विस्तार पावत जातो, याचं प्रांजळ चित्रणही आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTeam Niwant (Andhatvavar Maat) | टीम निवांत (अंधत्वावर मात)
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartडोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामर्थ्याने पायातले साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...
All BooksTeen Hotya Pakshini | तीन होत्या पक्षिणी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart' मी अशी का वागते हल्ली ? माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत ? आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल ? माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न ! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं ? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच ! टीन एजमध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! टीनएज डॉट कॉम १ दहा ते चौदा वर्ष
मार्गदर्शनपरTeenage Dot Com # 1 | टीनएज डॉट कॉम # १
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content