वैद्यकीय
-
Sale! Add to cartही केवळ कर्करोगाची जुजबी माहिती पुरवणारी तोंडओळख नाही, तर ही आहे कर्कविज्ञानातील काही निर्णायक क्षणांची रोमांचक गाथा ! या क्षणांनी, या घटनांनी अन् त्या घडवणाऱ्या कर्तबगार संशोधकांनी माणसाच्या जगण्याला सुखकारक वळण दिले. कर्कविज्ञानाशी संबंधित संकल्पना अन् उत्क्रांतिकारी शोध सुबोध अन् रंजक भाषेत मांडणारे हे पुस्तक वाचून प्रत्येकाचे कर्करोगाबद्दलचे आकलन विस्तारेल. सर्वसामान्यांच्या मनाला भेडसावणाऱ्या अनेक शंकांच्या योग्य निरसनाने गैरसमज दूर करणारी - या समस्येचे यथातथ्य रूप नजरेसमोर आणून समंजस अन सकारात्मक भाव जागवणारी -
वैद्यकीयKarkavidnyanachi Goshta | कर्कविज्ञानाची गोष्ट
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartबाईचं मन... एक अथांग डोह... बाईपण सुरू होताना... बाईपण सिध्द होताना... बाईपणाचं सार्थक वगैरे होताना... बाईपणातून सुटताना... बाईपणाचं ओझं पेलताना... बाईपणाचा अभिमान मिरवताना... आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक काय तुझ्या मनात ? वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं. बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.
वैद्यकीयKay Tuzya Manat? | काय तुझ्या मनात?
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cart'माणसाच्या शरीरातला किडनी हा एक महत्त्वाचा अवयव. दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्ये किडनीचा मोलाचा सहभाग असतो. या किडनीचे आरोग्य का बिघडते ? बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ? किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ? डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ? किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी ? सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे साध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे किडनीविषयी बोलू काही...'
वैद्यकीयKidneyvishayi Bolu Kahi | किडनीविषयी बोलू काही…
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमधुमेहाचे निदान व उपचार यापेक्षा दैनंदिन जीवनात त्याला सांगाती म्हणून समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. हीच खरी त्याच्याशी मैत्रीपूर्ण लढत असते. पूर्णत: शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत व थोडक्यात देणारे हे पुस्तक कोणालाही स्वत:चे जीवन आत्मविश्वासाने व सुखाने वाटचाल करण्यास मदत करू शकेल. मधुमेह या विषयावरचे लिखाण, पुस्तके इंग्रजी व मराठीत भरपूर झाली असली तरी आकडेवारीच्या बोजडपणामुळे, शास्त्रीय काटेकोरपणामुळे ती कंटाळवाणी वाटतात. आचरणात आणणे तर दूरच राहते. मधुमेहीच्या दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त होईल अशी माहिती सहज, सोप्या भाषेत व थोडक्यात देण्याची गरज होती. ती या पुस्तकाने भरून निघून मधुमेही अधिक आत्मविश्वासाने व सुखाने आपले जीवन समृध्द करतील अशी खात्री वाटते.
वैद्यकीयLadha Sakhreshi | लढा साखरेशी
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more -
Sale! Add to cartहा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपण, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत योग्य काय आणि अयोग्य काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, वाचावंच असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.
वैद्यकीयLaingikta Shikshan | लैंगिकता शिक्षण
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartएके काळी फक्त आयक्यू महत्त्वाचा मानला जात होता. आज त्याच्या बरोबरीने किंबहुना काकणभर जास्तच महत्त्व आले आहे ईक्यू ला - इमोशनल कोशंट वा भावनिक निर्देशांकाला! आयुष्यात हा ईक्यू जपायचा असेल, तर शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही सुदृढ हवे. आजच्या वेगवान जीवनात जगण्याच्या धावपळीत माणसाची दमछाक होत आहे. व्यक्तिगत जीवनापासून कौटुंबिक / सामाजिक / व्यावसायिक / सांस्कृतिक जीवनापर्यंत प्रत्येक पातळीवर विविध ताणतणावांना सामोरे जाणे व्यक्तीला भाग पडत आहे. अशावेळी आधार लाभतो कौन्सेलरचा आणि कौन्सेलिंगचा, मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा. जवळजवळ साडेतीन तपांचा काळ या क्षेत्रात काम केलेल्या अनुभवी कौन्सेलरनी आपल्या अनुभवांवर आधारित कथनातून मानसिक आरोग्याचा, समस्यांचा आणि उत्तरांचा घेतलेला वेध.
All BooksMaza Chetanamay Pravas | माझा चेतनामय प्रवास
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. अभय बंग, एम.डी. गडचिरोली सारख्या आदिवासी भागात स्वयंप्रेरणेने राहून आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. ... "...हा हृदयविकार खरंच अचानक झाला का ? की वर्षानुवर्षं तो रोज होतच होता; फक्त मला तो एक दिवशी अचानक जाणवला ? मृत्यूच्या जवळून दर्शनाचा माझ्या मनावर काय परिणाम झाला ? माझ्या हृदयरोगाचं कारण मला काय सापडलं ? हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी मी काय केलं ?" मी हृदयरोगाचा उपचार करण्याऐवजी हृदयरोगानेच माझा उपचार कसा केला ? ही कहाणी १९९६ साली 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. तिने जणू पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं. लक्षावधी लोकांनी ती वाचली, इतरांना दिली. हृदयरोगतज्ज्ञ आपल्या रुग्णांना औषधासोबत तो लेख द्यायला लागले. त्या वर्षीचा उत्कृष्ट ललित कृतीचा स्व. अनंत काणेकर पुरस्कार त्या लेखाला मिळाला. पुस्तकरूपात ती कहाणी आता उपलब्ध होते आहे. ... "...हृदयरोगामुळे माझ्या जीवनात सुरू झालेला शोध मला हृदयरोगापलीकडे घेऊन गेला. नंतर तर तो पुढला शोधच मध्यवर्ती झाला. 'सकाळ'मधला लेख लिहिल्यावर देखील तो शोध सुरूच राहिला. तो माझा नंतरचा प्रवास देखील इथे सांगितला आहे." शिवाय रुग्णांना, जिज्ञासूंना गरज पडते अशी माहिती शेवटी वेगळया प्रकरणात समाविष्ट केली आहे. "... आणि या कहाणीचा अंतही झालेला नाही. अजूनही रोज काहीतरी घडतं आहे. "
बेस्ट सेलरMaza Sakshatkari Hridayrog | माझा साक्षात्कारी हृदयरोग
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartमेंदूतला माणूस ! नाव जरा विचित्र वाटतंय ना ? माणसाच्या सा-या भावभावना, रागलोभ, आशानिराशा मेंदूत उपजतात, वाढतात. हसणं-रडणं, खेळणं-बागडणं, लढाई-झगडा सगळं काही मेंदूमध्येच. मेंदू म्हणजे केवळ बुध्दी आणि प्रज्ञाच नाही, तर कलाकौशल्य आणि क्रीडानैपुण्यसुध्दा ! प्रेमाची ज्योत मेंदूत तेवते. सूडाचा अंगारही इथंच पेटतो. जाणिवेचा प्रकाश, नेणिवेचा अंधार दोन्ही मेंदूच्या गाभा-यात एकत्र नांदतात. माणसातला चांगुलपणा मेंदूत जन्मतो आणि दुष्टपणा देखील ! माणूस म्हणजे मेंदूच. म्हणून तर मेंदूचा शोध म्हणजे माणसाचा शोध. माणसातल्या माणूसपणाचा शोध ! हाच शोध घेणारे मेंदुतला माणूस
वैद्यकीयMendutla Manus | मेंदूतला माणूस
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cartऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी, ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे, हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे.... ... आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृद्धश्रम, कौटुंबिक-कलह, संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक विषयांवरसुद्धा मैत्रिणीशा हितगुज करावे तसे वाचकांशी सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या रविवार सकाळ मधील मुग्ध मधुर या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक.
वैद्यकीयMugdha Madhur | मुग्ध मधुर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
वैद्यकीय
Mulanche Aarogya Palkanchya Hati | मुलांचे आरोग्य पालकांच्या हाती
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart
">
Skip to content
